Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!

मायकेल बेव्हन ऑस्ट्रेलियन संघाचे संकटमोचक फलंदाज म्हणून ओळखला गेले. 90 च्या दशकात जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ पराभवाच्या छायेत असायचा तेव्हा मायकेल बेव्हन खेळपट्टीवर पाय रोवायचे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊनच पॅव्हेलियनमध्ये जायचे. (Michael bevan match Finisher ODI Cricket)

Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 11:40 AM

मुंबई : क्रिकेटमध्ये फार थोडे मॅच फिनिशर आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचं (MS Dhoni) नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्याच्या मॅच फिनिश करण्याच्या स्टाईलबद्दल अनेक वेळा चर्चा झाल्या. पण त्याच्याही अगोदर क्रिकेट जगतात एक ओरिजनल मॅच फिनिशर होता तो खास त्याच्या स्टाईलमध्ये मॅच संपवायचा आणि संघाला विजय मिळवून द्यायचा, आम्ही सांगतोय ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मायकल बेवन (Michael Bevan) यांच्याबद्दल, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे…! (Happy Birthday Michael Bevan match Finisher ODI Cricket)

मायकल बेव्हन यांचं जागतिक क्रिकेटवर गारुड

मायकल बेवन यांना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज म्हणून ओळखलं जातं तसंच आपल्या मॅच फिनिश करण्याच्या स्टाईलने त्यांचं जागतिक क्रिकेटवर गारुड होतं. क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आणखीही आदराने घेतलं जातं. आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत त्यांची सरासरी 50 च्या वरती राहिली आहे.

मायकल बेव्हनच्या बॅटमधून 46 अर्धशतकं तर 6 शतकं

ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळायचे. चार किंवा पाच नंबरला खेळायला येऊन मॅच संपवूनच ते ड्रेनिंग रुममध्ये जायचे, अशी त्यांची खासियत होती. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 46 अर्धशतक केली तर 6 शतकंही ठोकली.

एकदा का खेळपट्टीवर पाय रोवला की मग प्रतिस्पर्धी संघाची हार पक्की…!

मायकेल बेवन ऑस्ट्रेलियन संघाचे संकटमोचक फलंदाज म्हणून ओळखला गेले. 90 च्या दशकात जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ पराभवाच्या छायेत असायचा तेव्हा मायकेल बेव्हन खेळपट्टीवर पाय रोवायचे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊनच पॅव्हेलियनमध्ये जायचे. 1994 मध्ये त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2004 मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला.

ती मॅच फिनिश केली अन्….

1996 मध्ये बेवन यांनी एका सामन्यात अशी खेळी केली की, त्या खेळीच्या जोरावर त्यांना मॅच फिनिशर म्हणून ओळख मिळाली. सिडनी येथे वेस्ट इंडीज विरूद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत केवळ 173 धावा करायच्या होत्या. परंतु वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची वाईट अवस्था केली. केवळ 38 रन्समध्ये 6 विकेट्स अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली.सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकला. त्याचवेळी खेळपट्टीवर बेवन फलंदाजीले आले. बेव्हन यांची संघर्षमय खेळी केली.

एक-एक, दोन-दोन रन्स घेत ते लक्ष्याचा पाठलाग करत होते. इवान हिलीसह बेवन यांनी 7 व्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली, त्यानंतर पॉल रिफेलसह 8 व्या विकेटसाठी 83 धावांच्या भागीदारीसह ऑस्ट्रेलियन संघाला विजयाच्या समीप आणलं. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती, बेवन यांनी शानदार चौकार ठोकला आणि चमत्कारिकरित्या आपल्या संघाला 1 विकेटने विजय मिळवून दिला.

(Happy Birthday Michael Bevan match Finisher ODI Cricket)

हे ही वाचा :

Video : पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा जान्हवी कपूरच्या गाण्यावर अप्रतिम बेली डान्स, एकदा पाहाच!

कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!

World Test Championship final 2021 : BCCI चं पुन्हा दुर्लक्ष, भारतीय संघातील फिरकीपटूचं करिअर संपण्याच्या मार्गावर!

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.