… म्हणून मला पहिल्या राऊंडमध्ये खरेदीदार मिळाला नाही : युवराज
मुंबई : युवराज सिंह… क्रिकेटमधलं एक असं नाव, जो समोर असेल तरीही गोलंदाजांनी धडकी भरायची. पण 37 वर्षीय युवराज सध्या करिअरच्या अशा टप्प्यातून जात आहे, जिथे त्याला स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कॅन्सरवर मात करुन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या युवराजला भारतीय संघ दूरच, पण आयपीएलमध्ये परतण्यासाठीही संघर्ष करावा लागला आणि स्वतःची कामगिरी दाखवल्यानंतर […]
मुंबई : युवराज सिंह… क्रिकेटमधलं एक असं नाव, जो समोर असेल तरीही गोलंदाजांनी धडकी भरायची. पण 37 वर्षीय युवराज सध्या करिअरच्या अशा टप्प्यातून जात आहे, जिथे त्याला स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कॅन्सरवर मात करुन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या युवराजला भारतीय संघ दूरच, पण आयपीएलमध्ये परतण्यासाठीही संघर्ष करावा लागला आणि स्वतःची कामगिरी दाखवल्यानंतर अखेर त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने पैसे मोजण्याची तयारी दाखवली.
आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात युवराजवर पहिल्या राऊंडमध्ये कुणीही बोली लावली नाही. पण दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यावर मुंबई इंडियन्सने बोली लावली. बेस प्राईस एक कोटी रुपयांमध्ये युवराजला खरेदी करण्यात आलं. गेल्या आयपीएलसाठी युवराजची बेस प्राईस दोन कोटी होती, ती यावर्षी त्याला एक कोटी रुपये करावी लागली. वाचा – आयपीएल लिलाव : दिग्गजांना मागे टाकत हे नवखे खेळाडू करोडपती बनले!
आयपीएलमध्ये संधी मिळाल्याबद्दल युवराजने आनंद व्यक्त केलाय. पहिल्या राऊंडमध्ये खरेदीदार न मिळाल्यामुळे कोणतीही निराशा नव्हती. कारण, पहिल्या राऊंडमध्ये खरेदीदार मिळणार नाही हे माहित होतं. यामागचं कारणही सोपं आहे. तुम्ही आयपीएलसाठी टीम निवडता तेव्हा, पहिल्यांदा युवा खेळाडूंवर नजर असते. मी करिअरच्या अशा टप्प्यात आहे, जिथे विचार केला जातो की हा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यात खरेदीदार नक्की मिळेल ही आशा होती, अशी प्रतिक्रिया युवराजने दिली आहे. वाचा – आयपीएलमध्ये युवराज सिंहला अखेर खरेदीदार मिळाला!
मुंबई इंडियन्समध्येच खेळण्याची संधी मिळेल, असं अगोदरपासून वाटत होतं. यावर्षी खेळण्याच्या संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मिळाली याचा आनंद आहे. आकाश अंबानी यांनी माझ्या बाबतीत चांगला विचार केला आणि विश्वास दाखवला. तर झहीर खान, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्समध्ये आहेत, ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलोय. तुम्हाला सपोर्ट असतो, तेव्हा तुम्ही आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित होता, असं युवराज म्हणाला. वाचा – तामिळनाडूचा मिस्ट्री गोलंदाज, ज्याच्यावर पंजाबने साडे आठ कोटी उधळले
निवृत्तीवर आत्ताच निर्णय घेणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलं. आता रणजी ट्रॉफी आहे आणि नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, ज्यातून तयारी करण्यासाठी मदत होईल. 2019 च्या विश्वचषकानंतर भविष्यावर निर्णय घेईल. पुढचे तीन ते चार महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं तो म्हणाला.