मनोज तिवारीची फिरकी घेताना भज्जीचीच विकेट, ट्वीट डिलीटनंतरही नेटिझन्सने हरभजनचे कान धरले!
मनोज तिवारीचा (Manoj Tiwary) राजकारणातला चढता आलेख पाहून भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याला शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा देताना हरभजनकडून चूकभूल झाली.

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलच्या तिकीटावर क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. केवळ आमदारकी मिळवून तो थांबला नाही तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यावर विश्वास दाखवून त्याची वर्णी थेट क्रीडा राज्यमंत्रीपदी लावली. मनोजचा राजकारणातला चढता आलेख पाहून भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याला शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा देताना हरभजनकडून चूकभूल झाली. पण झालेली चूक लक्षात येताच त्याने तातडीने ते ट्विट डिलीट केलं. पण तोपर्यंत त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Harbhajan Singh Controvercial tweet on manoj Tiwary)
हरभजनने ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मनोज तिवारीकडे क्रीडा व युवक राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. यानंतर शुभेच्छा देताना हरभजनकडून चूकभूल झाली. हरभजनने ट्विटमध्ये म्हटलं होतं, “मनोज तिवारी, तुला शुभेच्छा… कोणत्याही मुलासोबत असं होऊ देऊ नको, जे तुझ्या करिअरसोबत झालं, परमेश्वराने तुझ्यावर कृपा ठेवावी, शुभेच्छा…”
चूकभूल लक्षात येताच भज्जीने ट्विट केल डिलीट!
हरभजनने केलेल्या ट्विटमधला खोचकपणा नंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ते ट्विट डिलीट केलं. पण तोपर्यंत सोशल मीडियावर हरभजनचं ते ट्विट व्हायरल झालं होतं. आपल्या ट्विटमुळे वाद होऊ शकतो, असं वाटल्यानंतर त्याने एक पाऊल मागे घेतलं. एकंदरित मनोजला शुभेच्छा देताना भज्जीचीच विकेट गेल्याचं पाहायला मिळालं. भज्जीने ट्विट डिलीट केल्यानंतरही नेटकऱ्यांनी भज्जीचे कान धरले.

हरभजन सिंगने डिलीट केलेलं ट्विट!
शिवपूरमधून मनोज तिवारी विजयी
पश्चिम बंगालची निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. मात्र, येथील 294 जागांपैकी शिवपूर (Shibpur Election) या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. येथे ममतांच्या तृणमूल पक्षाने माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांना विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत मनोज तिवारीन यांनी रतीन चक्रवर्तींचा 32 हजार मतांनी पराभव केला.
ममतांची मनोज तिवारीला खास भेट, थेट राज्यमंत्रीपदी वर्णी
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारीला क्रीडा व युवक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाला होता. भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याने केला होता. जोरदार प्रचारानंतर त्याने निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली, त्यानंतर आता त्याला राज्यमंत्रीपद देखील मिळालं आहे.
(Harbhajan Singh Contravercial tweet on manoj Tiwary)
हे ही वाचा :
क्रिकेटला रामराम, मग आमदार, आता थेट क्रीडा राज्यमंत्रीपदी वर्णी
ममतादीदींचं जम्बो मंत्रिमंडळ, 7 मुस्लिम, 8 महिलांचा समावेश; ‘एम’ फॅक्टरला विशेष स्थान