Harbhajan Singh : हरभजन विचारतोय टीम इंडियाला हे ३ सवाल, काय आहेत हे प्रश्न पाहा
हरभजन सिंग याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील व्यवस्थापणाकडे मागितली आहेत. विचारलेले प्रश्न सध्याच्या क्रिकेट संघाशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचबरोबर भारतीय तरुण खेळाडूंविषयी, दिनेश कार्तिक आणि आयपीएल संबंधित आहेत.
आशिया चषकात (Asia Cup 2022) सलग दोन सामने हरल्यानंतर भारतीय संघातील (Indian Team) काही खेळाडूंवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कालचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता, त्या सामन्यात सुमार कामगिरी केल्यामुळे पुन्हा त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे.भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याने सुद्धा भारतीय संघ व्यवस्थापनाला 3 प्रश्न विचारले आहेत. हरभजन सिंगच्या तीन प्रश्नामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Where is Umran malik (150km speed) ? Why Deepak chahar (top quality swing bowler )wasn’t there ? Tell me if these guys don’t deserve the chances ?? Why Dinesh Karthik don’t get chances consistently?? Disappointing
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 6, 2022
हे सुद्धा वाचा
हरभजन सिंग याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील व्यवस्थापणाकडे मागितली आहेत. विचारलेले प्रश्न सध्याच्या क्रिकेट संघाशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचबरोबर भारतीय तरुण खेळाडूंविषयी, दिनेश कार्तिक आणि आयपीएल संबंधित आहेत.
नेमके काय आहेत प्रश्न
- आयपीएलमध्ये उमरान मलिक हा गोलंदाज 150 स्पीडच्या गोलंदाजीमुळे प्रकाशात आला होता. उमरान मलिकला का डावलण्यात आलं आहे. उमरान मलिक भारतीय टी-20 वर्ल्ड कपकडे मोठ्या आशेने पाहत होता. त्याला भारतीय संघात संधी मिळाली, परंतु सुरुवातीच्या सामन्यात त्याला अपयश आल्यामुळे त्याला भारतीय संघ व्यवस्थापनाने वगळले. सध्या तो जलदगती गोलंदाज कुठे आहे असा प्रश्न हरभजन सिंगने केला आहे.
- आशिया चषकासाठी दीपक चहरची निवड राखीव खेळाडू म्हणून का करण्यात आली. त्याला मुख्य संघात का घेतले नाही, त्याला स्विंग गोलंदाजी करण्याचा इतका अनुभव असल्यामुळे त्याला बाहेर का बसवले असा दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे.
- तिसरा प्रश्न हरभजन सिंग याने दिनेश कार्तिक विषयी केला आहे. दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे, तर संधी का मिळत नाही ? वारंवार का डावलण्यात येतं आहे.