Team India : हार्दीक पांड्यामुळे या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळेना, जाणून घ्या कारण
या खेळाडूचे करिअर उद्धवस्त करण्यासाठी हार्दीक पांड्या जबाबदार आहे का ?
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी केली. तसेच अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या (ENG) खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. सेमीफायनलच्या सामन्यात हार्दीक पांड्याने (Hardik Pandya) चांगली खेळी केली. त्यांच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने 168 धावापर्यंत मजल मारली. न्यूझिलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला टीम इंडियाचे कर्णधार पद देण्यात आले आहे.
युवा खेळाडूंची टीम न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे. काही खेळाडू ऑस्ट्रेलियातून न्यूझिलंडला रवाना झाले आहेत, तर काही खेळाडू न्यूझिलंडला इंडियातून जाणार आहेत. विशेष म्हणजे हार्दीक पांड्या चांगली खेळी करीत असल्यामुळे टीम इंडियाचा खेळाडू वेंकटेश अय्यरला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये.
ज्यावेळी हार्दीक पांड्या दुखापत ग्रस्त होता. त्यावेळी त्याच्या जागेवर वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली होती. वेंकटेश अय्यर सुद्धा हार्दीक पांड्या सारखा स्फोटक फलंदाज आहे. वेंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये सुध्दा चांगली फलंदाजी केली आहे.
वेंकटेश अय्यरची आर्यलॅंड आणि आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली होती, परंतु त्याला संधी देण्यात आली नाही.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र, चहलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.