Hardik Pandya | झंझावात, वादळ, धमाका, हार्दिक पंड्याची तुफानी खेळी, 55 चेंडूत 20 षटकार
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने डी वाय पाटील टी 20 चषकात झंझावात (Hardik Pandya fastest Century DY Patil T20 Cup) कायम ठेवला आहे.
नवी मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने डी वाय पाटील टी 20 चषकात झंझावात (Hardik Pandya fastest Century DY Patil T20 Cup) कायम ठेवला आहे. आधी 39 चेंडूत 105 धावांची वादळी खेळी खेळणाऱ्या पंड्याने, आता दुसऱ्या सामन्यात 55 चेंडूत नाबाद 158 धावांची धुवाँधार खेळी केली. महत्त्वाचं म्हणजे या सामन्यात त्याने 5-10 नव्हे तर तब्बल 20 षटकार ठोकले. (Hardik Pandya fastest Century DY Patil T20 Cup)
डी वाय पाटील टी 20 चषकात शुक्रवारी सेमीफायनलमध्ये पंड्याने झंझावात कायम ठेवला. रिलायन्स वनकडून खेळताना पंड्याने बीपीसीएलविरुद्ध केवळ 55 चेंडूत 158 धावा ठोकून वादळ निर्माण केलं. पंड्याने 20 षटकार आणि 6 चौकार मारले. पंड्याने धावून केवळ 14 धावा केल्या. उर्वरीत धावा त्याने चौकार आणि षटकार ठोकूनच केल्या.
Hardik Pandya Completed 150 in DY Patil T20 Cup With Huge Six.#HardikPandya #DyPatil pic.twitter.com/ngdOvT8RGf
— CricketMAN2 (@man4_cricket) March 6, 2020
नवी मुंबई झालेल्या या सामन्यात पंड्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर रिलायन्स वन ने 20 षटकात 4 बाद 238 धावा केल्या. पंड्याचा स्ट्राईक रेट तब्बल 287.27 इतका होता.
आधीच्या सामन्यातही झंझावात
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya Century in DY Patil T20 Cup) दुखापतीनंतर मैदानात धडाकेबाज एण्ट्री केली. पंड्याने मंगळवारी याच मालिकेत केवळ 39 चेंडूत तब्बल 10 सिक्सर आणि 8 चौकारांसह 105 धावांची झंझावाती खेळी केली होती.
डी वाय पाटील चषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने रिलायन्स वनकडून खेळताना महालेखा परीक्षक (CAG) संघाविरुद्ध झंझावाती फलंदाजी केली. रिलायन्सने या सामन्यात कॅगचा 101 धावांनी पराभव केला.
हार्दिक पंड्याच्या 10 षटकार आणि 8 चौकारांच्या जोरावर रिलायन्सने 20 षटकात 5 बाद 252 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅगची टीम 151 धावांत गारद झाली.
Hardik Pandya Last Two Inns In DY Patil T20 Cup 2020
1st Inns: Balls – 39 Runs – 105 SR – 269.2 6s – 10
2nd Inns: Balls – 55 Runs – 158* SR – 287.27 6s – 20
Combined: Balls – 94 Runs – 263 SR – 280. 6s – 30 4s – 14#DYPatilCup #HardikPandya pic.twitter.com/5KYudyWZZi
— CricketMAN2 (@man4_cricket) March 6, 2020
गोलंदाजीतही पंड्याची कमाल
त्या सामन्यात पंड्याने केवळ फलंदाजीत कमाल दाखवली असं नाही, तर त्याने गोलंदाजीतही चमक दाखवली. पंड्याने तब्बल 5 विकेट्स पटकावत, आपली अष्टपैलू कमगिरी बजावली. महत्त्वाचं म्हणजे हा सामना पाहण्यासाठी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसादही यावेळी मैदानात उपस्थित होते.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका येत्या 12 मार्चपासून सुरु होत आहे. त्यासाठी आफ्रिकेने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्याला स्थान मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- पहिला वन डे सामना – 12 मार्च – धर्मशाळा
- दुसरा वन डे सामना – 15 मार्च – लखनऊ
- तिसरा वन डे सामना – 18 मार्च – कोलकाता
संबंधित बातम्या
हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, 39 चेंडूत 105 धावा, 10 षटकार, चौकार किती?