IPL 2021 : गोलंदाजांचे कर्दनकाळ, पांड्या ब्रदर्स आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल, सहाव्यांदा जेतेपद मिळवणार?

मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सिक्सर किंग हार्दिक पांड्या (Hardik Pandya), क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.

IPL 2021 : गोलंदाजांचे कर्दनकाळ, पांड्या ब्रदर्स आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल, सहाव्यांदा जेतेपद मिळवणार?
मुंबई इंडियन्सच्या कॅम्पसाठी खेळाडू दाखल
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:02 AM

मुंबईइंग्लंडविरुद्धची (India Vs England) मालिका यशस्वीपूर्ण पार पाडत भारताचे खेळाडू आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठी आपापल्या फ्रेंचायजीच्या कॅम्पसाठी रवाना होत आहेत तर काही खेळाडू कॅम्पमध्ये दाखल आहेत. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सिक्सर किंग हार्दिक पांड्या (Hardik Pandya), क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. (Hardik Pandya Krunal Pandya And Suryakumar Yadav Join MI Camp In Mumbai)

पांडया ब्रदर्स आणि सूर्यकुमार कॅम्पमध्ये दाखल

मुंबईचा सलामीचा सामना विराटच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. टीममधील आक्रमक आणि कोणच्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेले पांड्या ब्रदर्स आणि मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात षटकार खेचण्याची कला असलेला सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.

इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज कामगिरी

हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धडाकेबाज कामगिरी केली. हार्दिकने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आपल्या बॅटची जादू दाखवली तसंच भारताच्या मालिका विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुण्यातील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

क्रुणालचं धडाकेबाज एकदिवसीय सामन्यातलं पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात आक्रमक फलंदाज क्रुणाल पांड्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. केवळ 27 चेंडूत अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याने केला. त्याच्या खेळीबद्दल अनेकांनी त्याचं कौतुकही केलं. परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने बोलिंग करताना 6 ओव्ह्रर्समध्ये 72 रन्सची खिरापत वाटली. त्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले.

मुंबईच्या कॅम्पमध्ये रोहित शर्मा दाखल

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आलंय. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

(Hardik Pandya Krunal Pandya And Suryakumar Yadav Join MI Camp In Mumbai)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!

IPL 2021 : RCB चे दिग्गज चेन्नईला जमायला सुुरुवात, विराट या दिवशी कॅम्पसाठी रवाना होणार!

IPL 2021 : धोनीच्या नेतृत्वात बोलर्सला खेळायला का आवडतं?, चेन्नईच्या करोडपती खेळाडूने सांगितली ‘राज की बात’!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.