Hardik Pandya : हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासरवाडीच्या लोकांना भेटला, जावयाला पाहून…
आशिया चषकापासून हार्दीक पांड्याची कामगिरी अधिक चांगली राहिली आहे.
टीम इंडियाचे (Team India) खेळाडू सोशल मीडियावर (Social Media) आपल्या अनेक खासगी गोष्टी शेअर करीत असतात. त्यामध्ये अनेकजण आघाडीवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. खेळाडूंचे सोशल मीडियावर अधिक फॅन आहेत. त्यामुळे ते वारंवार आपल्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी शेअर करीत असतात. हार्दीक पांड्या पहिंल्यादा सासुरवाडीला गेला आहे. त्याने तिथला एक अनोखा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) केला आहे.
From video and phone calls to finally meeting in person, wonderful to meet Nats’ (and now my) family for the first time. Grateful for moments like these ❤️ pic.twitter.com/ZrPcxJsUHr
— hardik pandya (@hardikpandya7) September 26, 2022
नताशा स्टेनकोविक हीच्या हार्दीक पांड्याने लग्न केल्यापासून तो कधीही सासुरवाडीला गेला नव्हता. परंतु तो कॉल आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सासुरवाडीच्या लोकांशी संपर्क साधत होता.
ज्यावेळी तो पहिल्यांदा सासुरवाड़ीच्या लोकांना भेटला, त्यावेळी त्यांचं प्रेम पाहुन तो भाराहून गेला.
नताशा स्टेनकोविक हीला हार्दिक पांड्याने दुबईमध्ये प्रपोज केले होते. त्यानंतर 2020 मध्ये दोघांनी लग्नं केलं. त्यानंतर दोघांना एक मुलगा देखील झाला आहे. मुलाचे नाव त्यांनी अगस्त्य असं ठेवलं आहे.
आशिया चषकापासून हार्दीक पांड्याची कामगिरी अधिक चांगली राहिली आहे. कारण त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कायम सातत्य राखलं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेमध्ये सुद्ध हार्दीक पांड्याने चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे, अंतिम ओव्हरमध्ये चौकार लगावून विजय मिळविल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं अधिक कौतुक सुरु आहे.