Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच नव्हे ‘या’ क्रिकेटर्सचाही झालाय घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बातम्या, अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 4 वर्षांचे वैवाहिक जीवन संपल्याची घोषणा केली. पण फक्त हार्दिक पांड्याच नव्हे तर भारतीय संघातील काही इतर खेळाडूंचाही घटस्फोट झाला असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच नव्हे 'या' क्रिकेटर्सचाही झालाय घटस्फोट
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 1:05 PM

भारतात लग्न हे पवित्र बंधन मानले जाते. याद्वारे फक्त दोन व्यक्तीच एकमेकांशी जोडल्या जात नाहीत तर दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नानंतर दोघेही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची स्वप्न पाहतात. पण काहीवेळा ते स्वप्न तुटू शकतं, एकमेकांना दिलेली वचनं पाळणं कठीण होतं आणि अखेर जोडपं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतं. असाच काहीसा प्रकार हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्यात पाहायला मिळाला. चार वर्षांच्या संसारानंतर ते दोघ एकमेकांपासून विभक्त झालेत. हा निर्णय आपल्यासाठी सोपा नव्हता, असेही हार्दिकने स्टेटमेंटमध्ये नमूद केले आहे. या घटस्फोटामुळे त्याने आपला मुलगाही गमावला आहे. त्याचा मुलगा अगस्त्य हा आता आई नताशासोबत सर्बियाला गेला आहे. हार्दिक पांड्याच्या आधीही असे काही क्रिकेटपटू होते ज्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शिखर धवन

एकेकाळी भारतीय संघात रोहित शर्मासोबत सलामीला उतरणाऱ्या शिखर धवनला घटस्फोटाचे दु:ख सहन करावे लागले. 2009 मध्ये मेलबर्नमध्ये शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. दोघांचे लग्न 11 वर्षं टिकलं मात्र, दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला . आणि मानसिक छळाच्या कारणावरून 2023 मध्ये धवनने आयेशाला घटस्फोट दिला. आयशा आणि तिचा मुलगा झोरावर हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून तिथेच राहतात.

हे सुद्धा वाचा

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकने त्याची मैत्रिण निकिता बंजारासोबत 2007 मध्ये लग्न केले. या लग्नासाठी त्यांनी बराच वेळ घेतला प्लानिंग केले होते. त्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ चांगले संबंध होते, परंतु दिनेशचे लग्न केवळ 5 वर्षे टिकू शकले. 2012 मध्ये, कार्तिकची पत्नी आणि त्याचा सहकारी मुरली विजय यांचं नातं सुरू झालं. हे समजल्यावर कार्तिकला धक्काच बसला. यानंतर त्याने घटस्फोट दिला. त्यानंतरकार्तिकने 2015 मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले.

मोहम्मद शमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केले. दोघांची पहिली भेट आयपीएलदरम्यान झाली होती. हसीन जहाँ त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर होती. मात्र लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2018 साली हसीन जहाँने शमीवर आरोप केले. त्याचे इतर मुलींशी अफेअर आहे असे सांगत, तिने घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. मात्र, दोघांचेही प्रकरण अद्याप न्यायालयात अडकले आहे. शमीला एक मुलगीही आहे, जी हसीन जहाँसोबत राहते. नुकतेच शमीने त्याच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट झाला आहे. त्याने 1996 मध्ये पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. काही वर्षांनंतर, त्याने संगीता बिजलानीशी घटस्फोट घेतला.

विनोद कांबळी

भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीने 1998 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईसशी लग्न केले. मात्र नंतर त्याच्यावर पत्नीवर अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप लावण्यात होता. यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.