‘नजर हटी दुर्घटना घटी…’, 22 वर्षीय युवा बोलर्सकडून MS धोनी क्लीन बोल्ड, पण तो बोलर कोण?
चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 22 वर्षीय गोलंदाज हरिशंकर रेड्डीच्या गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाला. रेड्डीला बॉल इतका स्पीडमध्ये होता की धोनीला काही कळायच्या आत बॉल लेग स्टम्पवर जाऊन आदळला. harikishan reddy bowled MS Dhoni
चेन्नई : आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. सगळे क्रिकेट रसिक या हंगामाची मोठी प्रतिक्षा करतायेत. त्यातही महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) खेळ बघण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. आयपीएल 2020 मध्ये सीएसके (Chennai Super Kings) पहिल्यांदा आयपीएलच्या इतिहासात लीग मॅचेसमधून बाहेर पडली. संपूर्ण हंगामात सीएसके बॅकफूटला गेली होती. सध्या सीएसकेची संपूर्ण टीम चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सराव करत आहे. (harikishan reddy bowled MS Dhoni CSK practice Session)
नजर हटी दुर्घटना घटी….
अशातच सीएसकेच्या फ्रेंचायजीने महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तगडे शॉट खेळताना दिसून येत आहे. तसंच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 22 वर्षीय गोलंदाज हरिशंकर रेड्डीच्या (harikishan reddy) गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाला. रेड्डीला बॉल इतका स्पीडमध्ये होता की धोनीला काही कळायच्या आत बॉल लेग स्टम्पवर जाऊन आदळला.
व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की धोनीला बोलिंग करण्यासाठी हरिकिशन रनअप घेतो. तो स्टम्पच्या जवळ येऊन पूर्ण ताकदीने बॉल फेकतो. तो बॉल एवढा स्पीडने पडतो की धोनीला बॉलचा अंदाज येत नाही. सरतेशेवटी धोनीचा लेग स्टम्प उखाडला जातो.
Hari Shankar Reddy taking Dhoni’s wicket during the practice#IPL2021 pic.twitter.com/zpEv8gHsp8
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 17, 2021
ड्रीम फोटो
हरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, ‘ड्रीम फोटो…’ दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.
हरिकिशन रेड्डीला चेन्नईने 20 लाख रुपये देऊन आपल्या संघात समावेश करुन घेतला आहे. त्याने आंध्रप्रदेशसाठी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी केलीय.
(harikishan reddy bowled MS Dhoni CSK practice Session)
हे ही वाचा :
IPL 2021 : नवा आयपीएल हंगाम, नवा रंग; दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लॉन्च
VIDEO | 14 व्या पर्वासाठी ‘मिस्टर आयपीएल’ सज्ज, मैदानात जोरदार सराव