T20 विश्वचषकात हर्षल पटेलची गोलंदाजी कुचकामी ठरेल
आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही.
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंची निवड झाली आहे. आशिया चषकात (Asia Cup) खराब गोलंदाजी केल्यामुळे अनेक खेळाडूंवरती टीका करण्यात आली होती. त्यामुळे तंदुरुस्त असलेल्या खेळाडूंची निवड होईल अनेकांना शंका होती. पण काही खेळाडूंना वगळण्यात आल्याने जोरदार टीका झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) माजी खेळाडूंनी चांगले खेळाडू का निवडले नाहीत अशी खंत सुद्धा बोलून दाखवली आहे.
भारताचा माजी फलंदाज सुनिल गावस्कर याने एका गोलंदाजाला चांगलंचं फटकारलं आहे. ज्यावेळी एका चाहत्याने त्यांना विचारलं की हर्षल पटेल याला संघात का घेतलं आहे. त्यावर त्यांची गोलंदाजी तिथं चालणार नाही असं उत्तर दिलं. त्याचबरोबर तो सगळ्यात जास्त तिथं धावा देईल असं ते म्हणाले आहेत.
ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आलेल्या खेळपट्टी ही जलदगती गोलंदाजांसाठी आहे. हर्षल पटेल याच्याकडे तेवढी गती नाही, त्यामुळे त्याला अधिक मार पडणार असंही ते म्हणाले.
आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. म्हणून आशिया चषकातून टीम इंडीयाला बाहेर पडावं लागलं.