IPL 2025 मध्ये मोहम्मद शमी सनरायजर्स हैदराबाद टीमकडून खेळतोय. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्घ 15 वा सामना खेळण्यासाठी तो ईडन गार्डन्सवर आला होता. शमी कोलकाता येथे पोहोचताच पूर्व पत्नी हसीन जहांने त्याच्यावर निशाणा साधला. हसीन जहांने मुलगी आयरावरुन मोहम्मद शमीवर सनसनाटी आरोप केले आहेत. शमी कलकत्त्यात आला, पण तो मुलीला भेटायला आला नाही, अशी टीका हसीन जहांने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. शमी आपल्या मुलीची काळजी घेत नाही असा दावा हसीना जहांने पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
3 एप्रिलला रात्री हसीन जहांने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर पोस्ट शेअर केलीय. त्यात तिने लिहिलय की, “शमी कलकत्त्याला येतो, पण कधी आपली मुलगी आयराला भेटायला येत नाही. शेवटचीवेळ शमी मुलीला भेटलेला, ते जस्टिस तीर्थांकर घोष यांच्या भितीने भेटायला आला होता” “शमीने कधीही मुलीला भेटण्याचा, तिला चांगलं शिक्षण देण्याचा आणि मुलीच भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला नाही. कुठल्याही सणाला किंवा वाढदिवशी सुद्धा मुलीशी बोलत नाही” असे आरोप पूर्व पत्नीने केले आहेत.
माझी मुलगी खूप रडली
“काही वर्षांपूर्वी बकरी ईद उल अजहा आधी बेबो म्हणजे मुलगी मोहम्मद शमीला सारखे-सारखे फोन आणि मेसेज करत होती. डॅडी मला तुमच्याशी बोलायचं आहे. अखेर शमी तिच्याशी बोलला, तेव्हा ती खुश झाली. दुसऱ्यादिवशी बेबोने पुन्हा फोन केला, तेव्हा शमी तिला म्हणाला की, रोज कॉल करु नको. मी व्यस्त आहे. त्यादिवशी माझी मुलगी खूप रडली. मागच्यावेळी शमी 6 वर्षानंतर कोर्टाच्या भितीने बेबोला भेटला होता” असं हसीन जहांने सांगितलं. त्याशिवाय जहांने शमीवर चांगले कपडे आणि आवश्यक वस्तू न देण्याचा सुद्धा आरोप केला होता.
अनैतिक संबंध, मॅच फिक्सिंग सारखे गंभीर आरोप
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांची आयपीएल दरम्यान ओळख झाली होती. त्यावेळी हसीन जहां कोलकाता नाइट रायडर्ससाठी चीयर लीडरच काम करायची. दोघांमध्ये प्रेम झालं, मग 2014 साली त्यांनी लग्न केलं. चार वर्षात त्यांचं लग्न मोडलं. हसीन जहांने शमीवर घरगुती हिंसाचार, अनैतिक संबंध, मॅच फिक्सिंग सारखे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. वर्ष 2018 पासून दोघे वेगळे राहू लागले दोघांना एक मुलगी आहे. ती आईसोबत राहते. मीडिया रिपोर्ट्नुसार शमी हसीनाला दर महिन्याला पोटगीपोटी 1 लाख 30 हजार रुपये देतो.