IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स, तरीही 4 वर्षापासून संघात जागा नाही, अमित मिश्रा भडकला, म्हणतो, ‘मी काय करावं…?’
पाठीमागच्या चार वर्षांपासून अमित मिश्रा भारतीय संघाबाहेर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याला निवड समितीने डावललं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स मिळवून देखील त्याच्या नशिबी गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघात खेळण्याचा योग नाही. Amit Mishra
मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स (highest wicket taker bowler in IPL) मिळवूनही भारतीय संघात जागा नाही. मी यापेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स काय करु शकतो?, असा उद्विग्न सवाल दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अनुभवी आणि सिनियर लेग स्पिनर्स अमित मिश्राने (Amit Mishra) उपस्थित केला आहे. आयपीएलच्या लढाईला आता केवळ चार दिवस उरले आहेत. अशातच मिश्राने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (highest wicket taker bowler in IPL No Space in Indian team What Should i Do Says Amit Mishra)
पाठीमागच्या चार वर्षांपासून अमित मिश्रा भारतीय संघाबाहेर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याला निवड समितीने डावललं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स मिळवून देखील त्याच्या नशिबी गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघात खेळण्याचा योग नाही. भारताकडून अमित मिश्रा 2017 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आयपीएल तोंडावर असताना त्याने आपल्या मनातली खंत व्यक्त करत नेमक्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
मी आणखी काय केलं पाहिजे…?
अमित मिश्रा म्हणाला, “आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स माझ्या नावावर आहेत. यापेक्षा मी अधिक चांगला परफॉर्मन्स काय देऊ? मोठ्या स्पर्धेत माझी कामगिरी चांगली राहिली आहे. माझं काम हे चांगलं प्रदर्शन करणं आहे ते मी गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. अशा काळात लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत, याचा मला बिल्कुल फरक पडत नाही.”
लेग स्पिनर्सची मानसिकता समजून घ्यायला हवी, चांगल्या कर्णधाराची आवश्यकता
“एका चांगल्या लेग स्पिनर्सला एका चांगल्या कर्णधाराची गरज असते की जो त्याला समजून घेईल. ज्यावेळी त्याच्याविरोधात फलंदाजाची बॅट बोलत असते त्यावेळी संबंधि त कर्णधाराने बोलर्सला समजून घेऊन त्याच्या पाठीमागे भक्कमपणे थांबायला हवं, त्याला धीर द्यायला हवा. साहजिक त्याने लेग स्पिनर्सची मानसिकता समजून घ्यायला हवी”, असंही अमित मिश्रा म्हणाला.
अमित मिश्राची शेवटची आयपीएल?
यंदाचा आयपीएल हंगाम अमित मिश्रासाठी शेवटचा हंगाम ठरु शकतो. कारण सध्या अमित मिश्राचं वय वर्षे 38 आहे. हे वय एखाद्या खेळाडूचं खूप जास्त मानलं जातं. तसंच आजच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहान दिलं जातं. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम अमित मिश्रासाठी शेवटचा हंगाम असेल, अशी चर्चा आहे.
आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा विकेट टेकर बोलर्स
आयपीएलमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स अमित मिश्राच्या नावावर आहेत. मुंबईकडून खेळणाऱ्या लसीथ मलिंगाच्या नावावर 170 विकेट्स आहेत. त्याच्या खालोखाल अमित मिश्राने 150 आयपीएल सामन्यांमध्ये 160 विकेच्स मिळवल्या आहेत.
भारतीय संघातले लेग स्पिनर्स कोण?
सध्या अमित मिश्राच्या तोडीचा भारतीय संघात लेग स्पिनर्स नाहीय. युजेवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चाहर हे लेग स्पिनर्स आहेत पण भारतीय संघातलं या गोलंदाजांचं स्थान तितकंस फिक्स नाहीय. कधी आत कधी बाहेर, असं या गोलंदाजांबाबत पाहायला मिळतं.
(highest wicket taker bowler in IPl No Space in Indian team What Should i Do Says Amit Mishra)
हे ही वाचा :