क्रिकेट विश्वातीस ऐतिहासिक दिवस, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसोटी सामना पाहण्यासाठी दिवसभर बसले

हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळण्यात आला होता.

क्रिकेट विश्वातीस ऐतिहासिक दिवस, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसोटी सामना पाहण्यासाठी दिवसभर बसले
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:10 AM

इस्लामाबाद : साधारणपणे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित असतात. संबंधित अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी राजकीय, क्रीडा, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. टी 20 क्रिकेटमुळे हल्ली कसोटी सामने पाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र काही वर्षांपूर्वी कसोटी सामना पाहण्यासाठी चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आले होते. historic day in the history of cricket when US President Dwight Eisenhower sat all day watching a Test match

अमेरिकेत साधारणपणे टेनिस, गोल्फ, बास्केटबॉल, बेसबॉल यासारखे खेळ खेळले जातात. टी 20 क्रिकेटमुळे आताआता अमेरिकेत क्रिकेट खेळाची सुरुवात होतेय. मात्र काही दशकांपूर्वी कसोटी सामना पाहण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानात आले होते. हे वाचून तुम्ही अवाक झाला असाल. पण हो, हा किस्सा खरा आहे.

हा सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1959 मध्ये खेळण्यात आला होता. या सामन्याचं आयोजन कराचीत करण्यात आलं होतं. हा सामना पाहण्यासाठी त्तकालीन अमेरिका राष्ट्राध्यक्ष ड्वाइट इसेनहॉवर (Dwight Eisenhower) आले होते. इसेनहॉवर हे अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी या कसोटी सामन्याचा पहिला संपूर्ण दिवस खेळाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे आतापर्यंत क्रिकेट इतिहासात इसेनहॉवर हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत. ज्यांनी स्टेडियममध्ये येऊन लाईव्ह कसोटी सामना पाहिला. इसेनहॉवर 1959 साली पाकिस्तान ( Dwight Eisenhower Pakistan 1959) दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानिमित्ताने त्यांनी या कसोटी सामना पाहिण्याचा आनंद घेतला.

त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळण्यात येत होता. इसेनहॉवर कराची राष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी 8 डिसेंबरला पोहचले. हा या सामन्याचा चौथा दिवस होता. हा सामना फार रंगतदार होईल, अशी अपेक्षा इसेनहॉवर यांना होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला.

सामन्याचा चौथा दिवस. पाकिस्तानचा संघ दुसरा डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दिवसभर फलंदाजी केली. दिग्गज फलंदाज हनीफ मोहम्मद मैदानात पाय रोवून उभे होते. दिवसभरात केवळ 5 विकेट्स गमावले. मात्र पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तानला 3 सत्रात एकूण मिळून केवळ 104 धावाच करता आल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटी हनीफ 40 धावांवर नाबाद होते. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. हनीफ यांनी शतक झळकावलं. त्यांनी नाबाद 101 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 225 धावांचे आव्हान मिळाले. मात्र पाचव्या दिवसाचा खेळ संपला. तेव्हा पर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स गमावून 83 धावा केल्या. परिणामी सामना अनिर्णित राहिला.

ऐतिहासिक दिवस

इसेनहॉवर कसोटी सामना पाहण्यासाठी आले. त्यामुळे 8 डिसेंबर 1959 हा दिवस ऐतिहासिक ठरला. इसेनहॉवर हे आतापर्यंत एकमेव राष्ट्राध्यक्ष राहिले, ज्यांनी लाईव्ह सामना पाहण्याचा आनंद घेतला.

इंतिखाब आलमचे कसोटी पदार्पण

इसेनहॉवर यांच्या उपस्थितीमुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. यासह या सामन्यात पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू इंतिखाब आलम (Intikhab Alam) यांनी कसोटी पदार्पण केलं. आलम यांनी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या कॉलिन मैक्डॉनल्ड बाद करत पहिली विकेट मिळवली.

दरम्यान सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 20 डिसेंबरपासून होणार आहे. कोरोनानंतरचा पाकिस्तानचा हा दुसरा दौरा आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 0-1 असा पराभव केला. तर पाकिस्तना टी 20 मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. 2 टी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंडन प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.

संबंधित बातम्या :

Pakistan Tour New Zeland | पाकिस्तानला ‘सातवा’ झटका, आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण

historic day in the history of cricket when US President Dwight Eisenhower sat all day watching a Test match

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.