IND vs BAN: 9 विकेट पडल्यानंतर बांगलादेश टीम कशी जिंकली ? या खेळाडूने विजयी प्लॅन उघड केला
या खेळाडूने विजयी प्लॅन उघड केला
मुंबई: कालची मॅच टीम इंडिया (IND) कधीचं विसरणार नाही अशी होती, असं म्हणायला हरकत नाही. कारण काल झालेल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या (BAN) शेवटच्या खेळाडूंनी 51 धावांची भागिदारी केली. त्यामुळे बांगलादेश टीमचा विजय झाला. बांगलादेश टीमच्या 9 विकेट पडल्या होत्या, त्यामुळे टीम इंडिया मॅच जिंकेल अशी स्थिती असताना, बांगलादेश टीमचा मेहदी हसन मिराज (mehdi hassan miraj) आणि मुस्ताफिजुर रहमान या जोडीने 51 धावांची भागीदारी केली आणि टीमला विजय मिळवून दिला.
काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे पुढची मॅच टीम इंडियाला जिंकावीचं लागणार आहे. कारण पुढची मॅच टीम इंडिया जिंकली तर मालिकेत बरोबरी होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी पुढची मॅच अधिक महत्त्वाची आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक चुका देखील केल्या आहेत.
मेहदी हसन म्हणतो की, “अल्लाह ची कृपा आहे, मी वर्तमान काळात खुष आणि उत्साहित आहे. मुस्ताफिजुर आणि मला एका विश्वासाची गरज होती. मी फक्त मुस्ताफिजुर 20 चेंडू शांत पद्धतीने खेळण्यास सांगितलं होतं. मी फक्त एका क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन धावा कशा करता येतील याचा विचार करीत होतो.”
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.