Sachin Tendulkar : 6 वर्षांनी मोठ्या अंजलीवर कसा जडला सचिनचा जीव ? क्रिकेटच्या देवाची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का ?

| Updated on: Jan 15, 2025 | 2:58 PM

'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला ओळखत नाही असा माणूस विरळाच. अवघ्या 16 व्या वर्षी त्याने थेट पाकिस्तानविरोधात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याचा खेळ, कारकीर्द याबद्दल  नेहमी चर्चा होत असते, त्याच्या धावा किती, किती शतकं केली हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना तोंडपाठ असेल.

Sachin Tendulkar : 6 वर्षांनी मोठ्या अंजलीवर कसा जडला सचिनचा जीव ? क्रिकेटच्या देवाची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का ?
सचिन तेंडुलकर- अंजली
Follow us on

‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला ओळखत नाही असा माणूस विरळाच. अवघ्या 16 व्या वर्षी त्याने थेट पाकिस्तानविरोधात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याचा खेळ, कारकीर्द याबद्दल  नेहमी चर्चा होत असते, त्याच्या धावा किती, किती शतकं केली हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना तोंडपाठ असेल. पण स्वभावाने थोडा लाजाळू असलेल्या सचनिच्या पर्सनल आयुष्याबद्दल कोणाला फारसं माहीत नाही. सचिन वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असला तरी त्याने वयाच्या 11 व्या वर्षीच हातात क्रिकेटची बॅट धरली होती. अशा सचिनने आयुष्यात क्रिकेटशिवाय इतर कशाचाही विचार केला का? तो कधी कोणाच्या प्रेमात पडला होता का? चला जाणून घेऊया.

सचिन-अंजलीबद्दल अनेकांना माहीत असेल. क्रिकेटच्या मैदानात तूफानी खेळी करणाऱ्या सचिनची लव्हस्टोरी देखील अनोखी आहे. सचिनला केवळ क्रिकेटचा देव म्हटले जात नाही, तर तो त्याच्या प्रेमकथेसाठीही ओळखला जातो. त्या दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. त्याचे अंजलीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी लग्न केले. विशेष म्हणजे अंजली ही सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.

पहिल्या नजरेतच प्रेमात

सचिन आणि अंजली पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांना विमानतळावर पाहिले. ही गोष्ट साधारण 1990 ची आहे. सचिन जेव्हा इंग्लंड दौऱ्यावरून परतत होता आणि अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रथमच पाहिलं, पण तेच खास होतं. एकदा पाहूनचे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तकेव्हा अंजली ही मेडिकल स्टुडंट होती आणि सचिनच्या क्यूट लूक्सवर फिदा झाली.

‘प्लेइंग इट माय वे’ (Playing It My Way) या आत्मचरित्रात सचिनने त्याच्या लव्हस्टोरी बद्दल लिहीलं होतं. “जेव्हा अंजलीने मला विमानतळावर पाहिले, तेव्हा ती सचिन-सचिन अशी ओरडत माझ्या मागे धावली.” त्यावेळी सचिन फक्त 17 वर्षांचा होता, तर अंजली 23 वर्षांची होती. अंजली सचिनला पाहून एवढी गुंग झाली होती की ती आईला घ्यायला आली होती हेच विसरली.’ असं त्यात लिहीलं होतं. तर एका रिपोर्टनुसार, अंजलीने स्वतः याबद्दल सांगितले होते की, “जेव्हा मी माझ्या आईला घ्यायला गेलो होतो, तेव्हा मी त्याला म्हणजे सचिनला पाहिले. माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की तो भारतीय क्रिकेट संघाचा एक अनोखा खेळाडू आहे. मी म्हटलं ठीक आहे! तो खूप क्यूट आहे. यानंतर मी माझ्या आईला विसरले आणि सचिनच्या मागे धावले’ असा किस्सा तिने सांगितला होता.

पण तेव्हा सचिन इतका लाजला की त्याने मागे वळून पाहिलचं नाही. नंतर अंजलीने सचिनचा नंबर शोधून काढला आणि त्याला फोन लावला. सचिननेच तेव्हा तो फोन उचलला, तेव्हा अंजलीने त्याला सांगितलं की मी अंजली बोलत्ये, मी तुला एअरपोर्टवर पाहिलं होतं. तेव्हा सचिन म्हणाला, हो मीही तुला पाहिलं, मी त्याला विचारलं मी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते. तेव्हा त्याने थेट उत्तर दिलं ऑरेंज टी-शर्ट, अशी आठवण अंजलीने सांगितली.

पत्रकार बनून अंजली पोहोचली सचिनच्या घरी

अंजलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा ती सचिनला भेटण्यासाठी पत्रकार असल्याचे भासवून त्याच्या घरी गेली होती. मात्र, सचिनच्या आईने तिला पाहून ती पत्रकार नसल्याचा संशय व्यक्त केला, कारण सचिनने कधीही कोणत्याही महिला पत्रकाराला मुलाखत दिली नव्हती किंवा त्याच्या घरीही कोणी पत्रकार आलेला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईला संशय आला की अंजली खरी पत्रकार नाही , अशी आठवणही तिने सांगितलं.
आठ

सचिन-अंजलीचं लग्न

बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर अखेर या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिली भेट झाल्यानंतर पाच वर्षांनी, 24 मे 1995 रोजी प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांची मुलगी अंजली आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी लग्न केले.तेव्हा सचिन अवघ्या 22 वर्षांचा होता तर अजंली 28 वर्षांची होती. ती त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, त्याबद्दल त्यांना अनेकदा प्रश्न विचारण्यात आला. पण वयातील या अंतरामुळे काहीच फरक पडत नसल्याचे दोघांनी नमूद केले होते. ” देवाने जे काही दिले त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत हे मी अंजलीकडून शिकलो आहे ” असे सचिनने एका मुलाखतीत सांगितले होते.