ODI World Cup 2023: टीम इंडिया वनडे वर्ल्डकपची तयारी कशी करणार? असं असेल सामन्यांचं वेळापत्रक

भारतानं गेल्या वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा क्रीडाप्रेमींची आहे. पण भारतीय संघाकडे यासाठी पुरेसा वेळ आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ODI World Cup 2023:  टीम इंडिया वनडे वर्ल्डकपची तयारी कशी करणार? असं असेल सामन्यांचं वेळापत्रक
ODI World Cup 2023: टीम इंडिया वनडे वर्ल्डकपची तयारी कशी करणार? असं असेल सामन्यांचं वेळापत्रकImage Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 5:27 PM

मुंबई : भारतात यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. मात्र भारतीय संघाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण नुकतंच ऑस्ट्रेलियाने भारताला 2-1 ने मात देत मालिका जिंकली. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची तयारी किती झाली आहे? हे क्रीडाप्रेमींनी अनुभवलं. इतकंच काय तर मिडल ऑर्डर सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलं.त्यामुळे भारतीय संघाला आणखी तयारी करण्याची गरज असल्याचं मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

खेळाडूंचं दुखापतग्रस्त होणं, त्यानंतर नव्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर सेट होणं यामुळे संघाची लय बिघडल्याचं दिसून येत आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादव कमाल करू शकला नाही. तिन्ही वनडे सामन्यात 1 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. त्यामुळे मधली फळी पूर्णपणे कमकुवत असल्याचं दिसत आहे.

आता 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार असून दीड महिना या स्पर्धेसाठी जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना खूपच मेहनत घ्यावी लागेल. वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला 12 वनडे मॅच खेळायच्या आहेत. त्यात 6 मॅच द्विपक्षीय मालिके अंतर्गत होती. तर सहा मॅच आशिया कपमध्ये खेळायचे आहेत. त्यामुळे भारतीय संघाला तयारीसाठी हवा तितका वेळ नाही.

निवड समितीला या 12 सामन्यांसाठी योग्य खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. मधल्या फळीत तग धरून खेळेल असा खेळाडू शोधावा लागणार आहे. अन्यथा वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाला खेळणं कठीण होईल.

भारतीय संघाचं शेड्युल

आयपीएल 2023 स्पर्धा 31 मार्च ते 28 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर 7 जून ते 11 जूनपर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी असेल. जुलै ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी 20 साामने खेळले जातील. आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार आहे. पण तारखा आणि स्थान निश्चित नसल्याने स्पष्टता नाही. ऑस्ट्रेलिया सप्टेबरमध्ये तीन सामन्याची वनडे मालिका खेळेल. 10 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप असणार आहे. यात एकूण 48 सामने खेळले जातील. पण स्थान, तारीख निश्चित नाही.

आशिया कपनंतर भारतीय संघाकडे वनडे वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी तीन सामने असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्याची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.