T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक

कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली गोलंदाजी करतील यात शंका नाही.

T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक
TEAM INDIA WINImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 9:39 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलियाच्या टीमचा (Australia Team) दणदणीत पराभव केला. काल फलंदाजांनी अचूक शॉट खेळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. पहिली मॅच ऑस्ट्रेलिया टीमने जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. कालचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पुन्हा टीम इंडिया जबरदस्त फॉर्म असल्याचे सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात केएल राहूल (KL Rahul) सोडला तर सगळ्या फलंदाजांनी आपली चांगली खेळी केली. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) सुरेख भागीदारीमुळे कालचा विजय सहज शक्य झाला.

1 कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली फलंदाजी करतील यात शंका नाही. परंतु केएल राहूल सुरुवातीला मोठी समस्या झाली आहे. केएल राहूलला आत्तापर्यंत सूर गवसलेला नाही.

2 दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला अद्याप लय सापडलेली नाही. कारण कालच्या मॅचमध्ये बुमराहने चार ओव्हरमध्ये पन्नासच्या वरती धावा दिल्या, त्यामुळे त्याची कामगिरी सुध्दा खराब झाली आहे.

हे सुद्धा वाचा

3 भुवनेश्वर कुमारने आत्तापर्यंत आशिया चषकापासून चांगली कामगिुरी केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीका केली जात आहे. झालेल्या तीन सामन्यात सुद्धा त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी झालेली नाही.

4 अंतिम ओव्हर सुरु असताना टीम इंडियाकडून अधिक धावा दिल्या जात आहेत. त्याला आवर घालणे गरजेचे आहे. कारण आशिया चषकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अंतिम ओव्हरमध्ये खराब कामगिरी केली आहे.

5 फिल्डींगमध्ये सुद्धा अधिक प्लेअर कमजोर असल्याचं मागच्या तीन सामन्यातून समोर आलं आहे. चांगल्या खेळाडूंनी खराब फिल्डींग केली आहे. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे कॅच सुद्धा सोडले आहेत.

सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.