Rohit Sharma : सूर्यकुमार यादव विश्रांती देण्याचा विचार, पाहा काय म्हणाला रोहित शर्मा
विश्वचषक स्पर्धेपर्यंत सूर्यकुमार यादव विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
आशिया चषकात (Asia Cup 2022) चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवची (Surykumar Yadav) सगळीकडे चर्चा आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून त्याच्याकडून सतत चांगली कामगिरी होत आहे. आशिया चषकातील त्याच्या षटकाराचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये सूर्यकुमार यादव अधिक व्हायरल झाला. कारण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली. अंतिम दोन सामन्यात त्याने उत्तुंग षटकार खेचले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत त्यांची फलंदाजी चांगली होईल अशी चाहत्यांना आशा आहे.
How can @surya_14kumar‘s dazzling form be retained? ?
?️ ?️ Here’s what #TeamIndia captain @ImRo45 said. #INDvSA pic.twitter.com/Gkbaej2dHc
— BCCI (@BCCI) October 2, 2022
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने मागच्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या नावावर एक नाव विक्रम झाला आहे. कमी सामन्यात अधिक धावा काढल्याचा विक्रम त्यांच्या नावावरती काल झाला आहे.
कालचा सामना जिंकल्यानंतर सुर्यकुमार यादव बाबत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही सुर्यकुमार यादवला विश्रांती देण्याचा विचार करीत असल्याचं रोहित शर्माने सांगितले.
विश्वचषक स्पर्धेपर्यंत सूर्यकुमार यादव विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.