ICC चे सगळेच पुरस्कार विराटला, तीनही अवॉर्ड जिंकणारा एकमेव क्रिकेटर
मुंबई: टीम इंडियाचं रनमशीन कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचीच प्रचिती आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards) मध्ये आली. कारण विराट कोहलीला आयसीसीचे महत्त्वाचे सर्व पुरस्कार मिळाले. विराट कोहलीला 2018 चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर (ICC Men’s Cricketer of the Year 2018) चा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तो सर गारफिल्ड […]
मुंबई: टीम इंडियाचं रनमशीन कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचीच प्रचिती आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards) मध्ये आली. कारण विराट कोहलीला आयसीसीचे महत्त्वाचे सर्व पुरस्कार मिळाले. विराट कोहलीला 2018 चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर (ICC Men’s Cricketer of the Year 2018) चा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तो सर गारफिल्ड सोबर्स चषकाचा मानकरी झाला. त्याशिवाय विराट कोहली पहिल्यांदाच सर्वोत्तम कसोटीपटू (ICC Men’s Test Cricketer of the Year) आणि सर्वोत्तम वन डे खेळाडू (ICC Men’s ODI Cricketer of the Year!) पुरस्कार जाहीर झाला.
त्यामुळे विराट कोहलीने अनोखी हॅटट्रिक केली. 30 वर्षीय विराट क्रिकेटर ऑफ द ईयर, टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर आणि वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर झाला.
विराट कोहली आयसीसीचा कर्णधार कोहलीने तीनही महत्त्वाचे पुरस्कार मिळवलेच, शिवाय त्याला आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ 2018 चा कर्णधार म्हणूनही निवडण्यात आलं. आयसीसीने मंगळवारी आपला 2018 चा वन डे आणि कसोटी संघ जाहीर केला. या दोन्ही संघांचं कर्णधारपद विराट कोहलीला देण्यात आलं.
कोहलीला कर्णधार करण्याचं कारण म्हणजे त्याने केलेली जबरदस्त कामगिरी. कोहलीने 2018 मध्ये 14 वन डे सामन्यात 9 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. भारताने एकूण 14 सामने जिंकले, केवळ चार सामने गमावले तर दोन सामने अनिर्णित राहिले.
कसोटीमध्ये विराट कोहली 2018 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीने 13 कसोटी सामन्यांमध्ये 55.08 च्या सरासरीने 1322 धावा केल्या.
ICC Men’s Cricketer of the Year ✅ ICC Men’s Test Cricketer of the Year ✅ ICC Men’s ODI Cricketer of the Year ✅ Captain of ICC Test Team of the Year ✅ Captain of ICC Men’s ODI Team of the Year ✅
Let’s hear from the man himself, @imvKohli! #ICCAwards ? pic.twitter.com/3M2pxyC44n
— ICC (@ICC) January 22, 2019
आयसीसी वन डे टीममध्ये रोहित, कुलदीप आणि बुमराह
‘आयसीसीच्या वन डे टीम ऑफ द ईयर 2018’ मध्ये विराट कोहलीसह भारताच्या आणखी तिघांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिटमॅन रोहित शर्मा, फिरकीपटू कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज जसप्रीम बुमराह यांचा समावेश आहे.
आयसीसी वन डे टीम रोहित शर्मा (भारत), जॉनी बेयरस्टो (इंग्लंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रूट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (विकेटकीपर, इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्ताफिजुर रहमान (बांगलादेश ), राशिद खान (अफगानिस्तान) कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमराह (भारत)
आयसीसी कसोटी संघ टॉम लॉथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), ऋषभ पंत (विकेटकीपर, भारत), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया),जसप्रीत बुमराह (भारत), मो. अब्बास (पाकिस्तान)
2017 ICC Awards: Cricketer of the Year: Virat Kohli ?? Test Player of the Year: Steve Smith ?? ODI Player of the Year: Virat Kohli ?? — 2018 ICC Awards: Cricketer of the Year: Virat Kohli ?? Test Player of the Year: Virat Kohli ?? ODI Player of the Year: Virat Kohli ??
— Mohandas Menon (@mohanstatsman) January 22, 2019