Icc Champions Trophy 2025चं संभाव्य वेळापत्रक, भारत-पाकिस्तान सामना केव्हा?
Icc Champions Trophy 2025 Tentative Schedule : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
आयसीसीने अवघ्या काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार असल्याचं जाहीर केलं. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आयसीसीकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक समोर आलं आहे.
रेव्ह स्पोर्ट्जनुसार, या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक गटात 4-4 संघ आहे. त्यानुसार, टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे 4 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये आहेत. स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 9 मार्चला अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. तर शेवटचा सामना हा इंडिया विरुद्ध न्यूझीलंड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर ए ग्रुपमधील (A1) विरुद्ध बी ग्रुपमधील (B2) आणि (B1) विरुद्ध (A2) यांच्यात उपांत्य फेरीतील सामने रंगतील. त्यानंतर 9 मार्चला अंतिम सामना होईल. तर 10 मार्च हा राखीव दिवस असणार आहे.
भारताचा पहिला सामना केव्हा?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. दुसर्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने असतील. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असेल.
टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक
CHAMPIONS TROPHY SCHEDULE OF TEAM INDIA. [RevSportz]
February 20th – vs Bangladesh.
February 23rd – vs Pakistan.
March 2nd – vs New Zealand. pic.twitter.com/JJEXWIz2Ob
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2024
- इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी
- इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी
- इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च