INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव

इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकात 306 धावा केल्या.

INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव
Follow us
| Updated on: Jul 01, 2019 | 11:12 AM

लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे. भारताचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला पराभव आहे.  इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं. भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं, मात्र त्याच्या शतकाला विजयाचा टिळा लागला नाही.  दरम्यान हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित झाले आहे, त्यामुळे पाकिस्तानची मात्र धाकधूक वाढली आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर आज (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विजय शंकर ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी 160 धावांची दमदार सलामी दिली. रॉयने 66 तर बेअस्ट्रोने 111 धावा ठोकल्या. त्यामुळे इंग्लंडला 337 धावांचा डोंगर उभा करता आला.

इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या षटकात लोकेश राहुल शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यामुळे टीम इंडियाची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने सावध पावित्रा घेत, डाव सवरला. भारताने 14 षटकात केवळ 50 इतकीच मजल मारली. त्यामुळे भारताचं रनरेट वाढत गेलं.

या दोघांनी जम बसल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. दोघांनीही अर्धशतकं पूर्ण केल्यानंतर धावगती वाढवणे आवश्यक होतं. मात्र ती म्हणावी तशी वाढली नाही. विराटची शतकी खेळीकडे वाटचाल सुरु असताना प्लंकेटच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि भारताची जमलेली जोडी फुटली.  विराटने 76 चेंडूत 66 धावा केल्या.  रोहित-विराटने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर रोहितच्या साथीला चौथ्या नंबरवर ऋषभ पंत आला. ऋषभने आडवे तिडवे फटके मारुन 32 धावा केल्या. पंतच्या साथीने रोहितने शतक पूर्ण केलं. मात्र क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या.   रोहित शर्माने 109 चेंडूत 102 धावा केल्या.  यानंतर मग हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतने खेळाची सूत्रे हाती घेतली. मात्र  ऋषभ पंतही 29 चेंडूत 32 धावा करुन माघारी परतला.

यानंतर हार्दिक पंड्याने धोनीच्या साथीने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही यश आलं नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने, धोनी, पंड्या, केदार जाधव यांना मोठे फटकेच मारता आले नाहीत.

पंड्याने 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तर धोनी 31 चेंडूत 42 धावा करुन नाबाद राहिला.  केदार जाधवने 12 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.

त्याआधी इंग्लंडने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी 13 षटकार आणि 27 चौकारांची दमदार खेळी केली. यामुळे टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान मागील दोन सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेणाऱ्या शमीने इंग्लंड विरुद्धच्या सामान्यातही भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या.  कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आलं.

सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या 10 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर यजमान इंग्लंडने 337 धावा ठोकल्या. बेअरस्टोसोबतच जेसन रॉय 66, बेन स्टोक्स 79 आणि जो रुट 44 धावा केल्या.

LIVE UPDATE

[svt-event title=”भारताला पाचवा झटका, हार्दिक पांड्या 45 धावा करत माघारी” date=”30/06/2019,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला चौथा झटका, ऋषभ पंत 32 धावा करत माघारी” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला तिसरा झटका, शतकी खेळी करणारा सलामीवीर रोहित शर्मा बाद” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी ” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला दुसरा झटका, कर्णधार विराट कोहली 66 धावांवर बाद” date=”30/06/2019,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीसोबत भारताच्या रडत रडत 100 धावा पूर्ण” date=”30/06/2019,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताच्या 10 षटकांत 1 बाद, 28 धावा” date=”30/06/2019,7:58PM” class=”svt-cd-green” ] इंग्लंडच्या गोलंदाजांना भेदक गोलंदाजीचा पाठलाग करताना टीम इंडियाचा पार धुव्वा उडाला आहे. भारताने 10 षटकात अवघ्या 28 धावा केल्या आहेत, तर टीम इंडियाचा सलामीवीर के.एल.राहुल शून्यावर बाद झाला  [/svt-event]

[svt-event title=”भारताला पहिला झटका, सलामीवीर लोकेश राहुल बाद” date=”30/06/2019,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.