ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत

आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील पुरस्कारासाठी (ICC Player of the Month Award) नामांकन जाहीर केले आहेत. ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत
आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील पुरस्कारासाठी (ICC Player of the Month Award) नामांकन जाहीर केले आहेत. ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 4:31 PM

दुबई : आयसीसीने (icc) अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी (ICC Player of the Month Award) 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. यामध्ये टीम इंडिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा समावेश आहे. टीम इंडियाकडून अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), इंग्लंडकडून कर्णधार जो रुट (Joe Root) आणि वेस्ट इंडिजच्या काइल मेयर (Kyle Mayers) यांना नामांकन मिळालं आहे.आयसीसी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जो रुटला नामांकन मिळण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. (icc give nomination to r ashwin joe root and kyle mayers for player of the month february award)

फेब्रुवारी महिन्यातील कामगिरी

या तिनही खेळाडूंनी फेब्रुवारी महिन्यात शानदार कामगिरी केली. जो रुटने टीम इंडिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील सामन्यात 218 धावा केल्या आहेत. तसेच त्याने तिसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेण्याची शानदार कामगिरी केली होती. तसेच अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या 3 कसोटींमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या सामन्यात 9, दुसऱ्या सामन्यात 8 आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्स मिळवल्या आहेत. तर 106 धावांची शतकी खेळी केली आहे. तर विंडिजच्या काइल मेयर्सने बांगलादेश विरुद्धातील कसोटी पदार्पणातील सामन्यात धमाकेदार द्विशतकी खेळी केली होती. मेयर्सने फेब्रुवारी महिन्यात एकूण 261 धावा केल्या आहेत.

अश्विनला पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता

हा पुरस्कार अश्विनला मिळण्याती तीव्र शक्यता आहे. अश्विनने बोलिंगसह बॅटिंगनेही दमदार खेळी केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 106 धावा केल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू खेळीमुळे हा पुरस्कार त्याला मिळू शकतो. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अश्विनने मोठी झेप घेतली. अश्विनने गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये 4 स्थानांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ताज्या आकडेवारीनुसार अश्विनचे एकूण 823 रँकिंग पॉइंट्स आहेत.

पुरस्काराची घोषणा केव्हा होणार?

फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा या महिन्यातील दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 8 मार्चला करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळतो, याकडे क्रिकेट विश्वाच लक्ष असणार आहे. दरम्यान जानेवारी 2021 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. हा पहिला पुरस्कार टीम इंडियाच्या रिषभ पंतने पटकावला होता.

संबंधित बातम्या :

Icc Test Ranking | आयसीसी कसोटी क्रमवारीत अश्विन आणि रोहितची मोठी झेप, पुजारा-बुमराहची घसरण

Rishabh Pant | टीम इंडियाचा रिषभ पंत ठरला ICC Men’s Player of the Month पुरस्कराचा मानकरी

icc give nomination to r ashwin joe root and kyle mayers for player of the month february award)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.