WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा

WTC फायनल मॅच जर ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने दिलं आहे. (ICC Playing Condition announced For WTC Final 2021)

WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा
WTC Final
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:57 PM

मुंबई : भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. ही मॅच जर ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने दिलं आहे. जर अंतिम सामना ड्रॉ झाला किंवा टाय झाला तर दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजयी घोषित केलं जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयसीसीने केली आहे. (ICC Playing Condition announced For India vs New Zealand World test Championship Final 2021)

मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

अशा स्थितीत सामना अनिर्णित

आयसीसीने घेतलेले दोन्ही निर्णय जून 2018 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी घेतले आहेत. पूर्ण पाच दिवसांच्या खेळानंतरही सामन्याचा निकाल न लागल्यास अतिरिक्त दिवसाचा खेळ होणार नाही आणि अशा परिस्थितीत सामना अनिर्णित घोषित केला जाईल.

सामन्यादरम्यान काही कारणाने ठराविक वेळ गेल्यास, आयसीसीचे सामनाधिकारी नियमितपणे संघ आणि माध्यमांना राखीव दिवसाचा वापर कसा करता येईल याविषयी माहिती देतील. राखीव दिवस वापरला जाईल की नाही, याची घोषणा पाचव्या दिवशी खेळाच्या शेवटचं सत्र सुरू होण्यापूर्वी केली जाईल. सामन्यात ग्रेड 1 ड्यूक क्रिकेट बॉल वापरला जातील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्लेइंग कंडिशननुसार काही बदल देखील पाहायला मिळू शकतात.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल

(ICC Playing Condition announced For India vs New Zealand World test Championship Final 2021)

हे ही वाचा :

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.