ICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत पुजारा-रहाणे जोडी हिट, विराट, बुमराह आणि अश्विनचं स्थान कायम
या टेस्ट क्रमवारीत (icc test ranking) अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला फायदा झाला आहे.
दुबई : आयसीसीने अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (Icc Test Ranking) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. फंलदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत कर्णधारपदाची भूमिका बजावणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) एका स्थानाचा फायदा झाला आहे. तसेच नियमित कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आपलं स्थान कायम राखण्यास यश आले आहे. तर गोलंदाजांच्या यादीत यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Yorker King Jasprit Bumrah) आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनही (Ravichandran Ashwin) आपलं स्थान अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. (icc test ranking cheteshwar pujara and ajinkya rahane jumped on 6th and 8th positon)
टॉप 10 मध्ये 3 भारतीय फलंदाज
फंलदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार 862 रेटिंग्स पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर तारणहार असलेला पुजारा आणि रहाणेने क्रमवारीत एका स्थानाने झेप घेतली आहे. पुजाराने 760 रेटिंग्ससह 7व्या क्रमांकावरुन 6व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर रहाणेलाही एका क्रमांकाचा फायदा झाला आहे. रहाणे 748 पॉइंट्ससह 8 व्या क्रमांकावर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) हे दोन्ही खेळाडूचं एकूण 4 सामने खेळले होते. या दोघांनी 4 ही सामन्यात निर्णायक कामगिरी केली होती. या कामगिरीचा फायदा त्यांना क्रमवारीत झाला आहे.
Significant changes in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting ?
Full list: https://t.co/gDnVaiQl0W pic.twitter.com/PPRDZKvuMp
— ICC (@ICC) January 30, 2021
या तिघांव्यतिरिक्त टीम इंडियाचा एकही फलंदाज या टॉप 10 यादीत नाही. या यादीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमन्सन कायम आहे.
गोलंदाजांच्या यादीत अश्विन आणि बुमराह 760 आणि 757 रेटिंग्ससह अनुक्रमे 8 व्या आणि 9 व्या क्रमांकावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 908 गुणांसह अव्वल स्थान कायम राखलं आहे.
James Anderson has jumped one spot to No.6 in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling ?
Full list: https://t.co/m1fyaVsU2B pic.twitter.com/173TqvXM0a
— ICC (@ICC) January 30, 2021
दरम्यान काही दिवसांपूर्वी आयसीसीने वनडे रॅंकिग जाहीर केली होती. यामध्ये विराट आणि रोहित शर्माने पहिलं आणि दुसरं स्थान राखलं होतं. तसेच गोलंदाजांमध्ये बुमराहने तिसरं स्थान कायम ठेवलं. तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची एका स्थानने घसरण झाली. जाडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. यामुळे त्याला चौथ्या कसोटीला मुकावे लागले होते. तसेच त्याला या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता येणार नाही.
संबंधित बातम्या :
ICC ODI Rankings: विराट कोहली-रोहित शर्माचा दबदबा कायम, बुमराह तिसऱ्या क्रमांकावर तर जाडेजाची घसरण
(icc test ranking cheteshwar pujara and ajinkya rahane jumped on 6th and 8th positon)