…म्हणून अनुष्का विश्वचषकात विराटसोबत मैदानात येणार नाही!
मुंबई : कर्णधार विराट कोहलीसाठी 2019 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर्षी कर्णधार म्हणून विराट कोहली पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. विराटचे संपूर्ण लक्ष हे फक्त क्रिकेटवर राहावे, त्याचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी विराट आणि अभिनेत्री अनुष्काने विश्वचषकासाठी काही खास प्लॅन बनवले आहेत. भारताला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी विराटच नाही तर अनुष्काही आपल्यापरिने प्रयत्न करत आहे. […]
मुंबई : कर्णधार विराट कोहलीसाठी 2019 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर्षी कर्णधार म्हणून विराट कोहली पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. विराटचे संपूर्ण लक्ष हे फक्त क्रिकेटवर राहावे, त्याचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी विराट आणि अभिनेत्री अनुष्काने विश्वचषकासाठी काही खास प्लॅन बनवले आहेत. भारताला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी विराटच नाही तर अनुष्काही आपल्यापरिने प्रयत्न करत आहे. पण, यावेळी विश्वचषकादरम्यान तुम्हाला विरुष्काला सोबत बघता येणार नाही, कारण यावेळी अनुष्का विराटसोबत स्टेडियममध्ये जाणार नाही.
सोबत स्टेडियममध्ये न जाणे हेही विरुष्काच्या प्लॅनमध्ये आहे. अनुष्का पती विराटसोबत इंग्लंडला तर जाईल, पण ती विराटसोबत स्टेडियममध्ये जाणार नाही. ती स्वत: स्टेडियममध्ये जाणार आहे. भारताच्या सामन्यावेळी अनुष्का स्वत:च्या गाडीने स्टेडियमला जाईल. तसेच ती स्टेडियमला येण्या-जाण्याचा खर्चही स्वत: करणार आहे. असे करण्यामागील कारण म्हणजे, विराट आणि अनुष्काला विश्वचषकादरम्यान माध्यमांपासून दूर राहायचे आहे. माध्यमांमुळे विराटचे लक्ष विचलित होऊन तो त्याच्या खेळावर पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासोबत त्यांच्याच गाडीत प्रवास करतात. मात्र, यावेळी अनुष्का स्वत:च्या खर्चाने स्टेडियममध्ये येण-जाणं करणार आहे. कर्णधार म्हणून विराट पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार असल्याने त्याच्या संघाने यावेळी जिंकावं असं अनुष्काला वाटतं. त्यामुळे अनुष्का यासाठी विराटची जमेल ती मदत करते आहे.
2015 सालच्या विश्वचषकात अनुष्का विराटचा सामना बघायला गेली होती. त्यावेळी सेमीफायनलमध्ये विराट काही खास कामगिरी करु शकला नाही. त्यासाठी अनुष्काला ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच 2016 सालच्या टी-20 विश्वचषकादरम्यानही अनुष्काला ट्रोल करण्यात आलं होतं. यावेळी विराट ट्रोलर्सवर चांगलाच संतापला होता. अनुष्काने विराटसोबत स्टेडियमवर न जाण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. मात्र, विरुष्काच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना या जोडीला स्टेडियमवर एकत्र बघता येणार नाहीये.