INDW vs AUSW: ‘या’ क्षणाला भारतीय संघानं गमवला सामना, पाहा Video आणि तुम्हीच सांगा काय चुकलं
ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. भारतीय महिला संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला.
मुंबई : भारताचं आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. भारतीय महिला संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला.ऑस्ट्रेलियाने भारताला उपांत्य फेरीत 5 धावांनी पराभूत केलं. अतितटीच्या सामन्यात भारत विजयी होईल असं वाटत असताना एक चूक भोवली आणि त्यामुळे पराभव सहन करावा लागला. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरनं जेमिमा सोबत संघाची बाजू सावरली खरी. पण एक चूक चांगलीच महागात पडली.हरमनप्रीत कौर 52 धावांवर असताना धावचीत झाली आणि तिथेच सामना फिरला. याबाबतची कबुली खुद्द हरमप्रीत कौरनं दिली. तिने 34 चेंडूत 52 धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. मात्र धावचीत होऊन तंबूत परतली. पण तिची कॅप्टन इनिंग क्रीडाप्रेमींच्या चांगलीच लक्षात राहिली.
“यापेक्षा दुर्दैवी वाटू शकत नाही.जेमीसोबत चागंली भागीदारी केली. त्यामुले हरण्याची आम्हाला अपेक्षा नव्हती.मी ज्या प्रकारे धावबाद झालो, त्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही.प्रयत्न करणे महत्त्वाचे होते आणि आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलो याचा आनंद झाला.आम्ही पुन्हा काही सोपे झेल सोडले.जेव्हा तुम्हाला जिंकायचे असेल,तेव्हा तुम्हाला तुमच्या संधी घ्याव्या लागतील.आम्ही यातून शिकू शकतो.”, असं कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितलं.
Here we lost the game.But well played Team India #INDWvsAUSW pic.twitter.com/GSDqm7RS0g
— Arindam Dey (@Arindam79080505) February 23, 2023
ऑस्ट्रेलियाचा डाव
एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीनं संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 52 धावांची आश्वासक भागीदारी केली. एलिसा हिली बाद झाल्यानंतर मूनी आणि मेग लॅनिंगनं डाव सावरला. दोघांची संघाची धावसंख्या 88 पर्यंत नेली. बेथ मूनी तंबूत 54 धावा करून परतली. त्यानंल्यानंतर लॅनिंगनं आपली खेळी सुरुच ठेवली. तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर मेग लॅनिंग आणि ग्रेस हॅरिस जोडी फार काही करू शकली नाही. हॅरीस शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोलंदाजांना मेग लॅनिंग आणि एलिसे पेरी ही जोडी फोडता आली नाही. रेणुका सिंगने सर्वात महागडं षटक टाकलं. तिने 4 षटकात 41 धावा दिल्या. तिला एकही गडी बाद करता आला नाही. शिखा पाडे (2), राधा यादव 1 आणि दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. तर स्नेह राणाला एकही गडी बाद करता आला नाही.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.
Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.