World Cup 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, 9 दिवसांनी रंगणार हायव्होल्टेज सामना
ICC T20 World Cup: वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण मारणार बाजी? याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.
India Vs Pakistan Match: आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप (ICC WOMENS T20 WORLD CUP) स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. एकूण दहा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले असून क्रीडाप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध पाकिस्तान (इंडिया वर्सेस पाकिस्तान) या सामन्याकडे लागून आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही संघ एकमेकांसमोर 12 फेब्रुवारी 2023 रोजी उभे ठाकणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. अंडर 19 महिला क्रिकेट संघांनी नुकतच टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. भारतीय संघाचा गेल्या काही महिन्यातील फॉर्म पाहता यंदाच्या विश्वचषकावर भारतीय संघच नाव कोरेल अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे. आयसीसीच्या गटवारीनुसार अ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ आहेत. तर ब गटात इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ आहेत.
आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात तीन संघांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाचवेळा, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनं एकदा जेतेपद पटकावलं आहे. गेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. 20 षटकात चार गडी गमवून 184 धावा केल्या होत्या. हे आव्हान गाठताना भारतीय संघाची कठीण झालं. अवघ्या 99 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला होता.
या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव
- 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड)
- 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड)
- 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड)
- 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड)
- 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज)
- 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड)
- 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत)
भारतीय संघ – हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे
पाकिस्तानी संघ- अयेशा नसीम, जवेरिया खान, सदाफ शाम्स, सिद्रा अमीन, अलिया रियाझ, बिस्माह मरुफ (कर्णधार), फातिमा साना, निदा दार, ओमैमा सोहेल, मुनीबा अली, सिद्रा नवाज, एमन अनवर, डायना बैग, घुलाम फातिमा, कैनत इम्तियाझ, नाश्रा संधू, सादिया इकबाल, तुबा हस्सन