ICC T20 World Cup 2023 जेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारताच्या वाघिणी सज्ज, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारतीय महिला संघ सध्या चांगलाच फॉर्मात असून यंदाच्या वर्ल्डकपवर नाव कोरणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे.
मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून एकूण दहा संघ आहेत. 21 फेब्रुवारीपर्यंत साखळी फेरीतील सामने असून अ आणि ब गटात टॉपला असलेल्या 2 संघांची उपांत्य फेरीत निवड होणार आहे. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे पाच संघ आहेत. तर ‘ब’ गटात इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ आहेत. उपांत्य फेरीचा सामना 23 आणि 24 फेब्रुवारीला असणार आहे. तर अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी रंगणार आहे. अंतिम फेरीपर्यंत एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण चार सामने खेळणार आहे. म्हणजेच चार सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत धडक मारेल. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय महिला संघाला इंग्लंड, आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी भिडावं लागणार आहे. वर्ल्डकप इतिहासात भारत आणि पाकिस्तान संघ 10 वेळा आमनेसामने आले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर टी 20 वर्ल्डकपमध्ये 6 पैकी चार सामन्यात भारत, तर दोन सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली आहे.
भारतीय संघाचे सर्व सामने आणि तारखा
भारत विरुद्ध पाकिस्तान (12 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (15 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता) भारत विरुद्ध इंग्लंड (18 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता) भारत विरुद्ध आयर्लंड (20 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
संपूर्ण सामन्याचं वेळापत्रक
- 10 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका
- 11 फेब्रुवारी, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
- 11 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड
- 12 फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान
- 12 फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
- 13 फेब्रुवारी, आयर्लंड विरुद्ध इंग्लंड
- 13 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलँड
- 14 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
- 15 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
- 15 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड
- 16 फेब्रुवारी, श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- 17 फेब्रुवारी, न्यूझीलँड विरुद्ध बांगलादेश
- 17 फेब्रुवारी, वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड
- 18 फेब्रुवारी, भारत विरुद्ध इंग्लंड
- 18 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- 19 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज
- 19 फेब्रुवारी, न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका
- 20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध आयर्लंड
- 21 फेब्रुवारी, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
- 21 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश
- 23 फेब्रुवारी, उपांत्य फेरी
- 24 फेब्रुवारी, उपांत्य फेरी
- 26 फेब्रुवारी, अंतिम सामना
टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव
- 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
- 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
- 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
- 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
- 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.
भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे
पाकिस्तानी संघ- अयेशा नसीम, जवेरिया खान, सदाफ शाम्स, सिद्रा अमीन, अलिया रियाझ, बिस्माह मरुफ (कर्णधार), फातिमा साना, निदा दार, ओमैमा सोहेल, मुनीबा अली, सिद्रा नवाज, एमन अनवर, डायना बैग, घुलाम फातिमा, कैनत इम्तियाझ, नाश्रा संधू, सादिया इकबाल, तुबा हस्सन
ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट
दक्षिण आफ्रिकन संघ- अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सुने लूस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा, शबनिम इस्माईल
श्रीलंकन संघ- चमारी अथापट्टू (कर्णधार), हर्षिथा समाराविक्रमा, कविश डिल्हारी, निलाक्षी डिसिल्वा, विश्मी गुणरत्ने, अमा कंचना, ओशाडी राणसिंगे, सथ्या संदीपानी, अनुस्का संजीवनी, कौशानी नुथ्यानगाना, अचिनी कुलासुरिया, इनोका राणवीरा, मालशा शेहानी, सुगंधिका कुमारी, थरिका सेव्वांडी
इंग्लंड संघ- अलिस कॅप्से, डॅनी वॅट, मैया बाउचिर, सोफिया डुंकले, चार्ली डीन, डॅनियल गिब्सन, हीथर नाईट (कर्णधार), नॅट क्विअर, अमी जोन्स, लॉरेन विनफिल्ड हिल, फ्रेया डेविस, इस्सी वोंग, केट क्रॉस, कॅथरिन ब्रंट, लॉरेन बेल, सारा ग्लेन, सॉफि एक्सेलस्टोन
न्यूझीलँड संघ- ब्रूके हॅलिडे, जॉर्जिया प्लिम्मर, लॉरेन डाउन, मॅडी ग्रीन, अमेलिया केर, सोफी डिवाइन (कर्णधार), सुझी बेट्स, बर्नाडाईन बेझुईडेनहाउट, इडेन कार्सन, फ्रान जोनस, हना रोव्ह, हॅरले जेनसेन, जेन केर, ली तहुहु, मोली पेनफोल्ड
बांगलादेश संघ- फऱगाना हक, मुर्शिदा खातुन, शर्मिन अख्तर, शोरना अक्तर, सोभना मोस्तरी, लता मोंडल, रितू मोनी, रुमाना अहमद, सलमा खातुना, दिलारा अक्तर, निगर सुल्ताना (कर्णधार), शमिमा सुल्ताना, डिशा बिस्वास, फहिमा खातुन, जहानारा आलम, मरुफा अक्तर, नहिदा अक्तर, रबेया खातुन, संजिदा अक्तर मेघला
आयर्लंड संघ- अमी हंटर, गॅबी लेव्हीस, लॉसी लिटल, रिबेक्का स्टोकेल, शाउना कवनाघ, अरलेना केली, इमीर रिचर्डसन, लॉरा डेलनी (कर्णधार), लीह पॉल, ओरला प्रेंडरगस्ट, सोफी मॅकमोहन, मॅरी वॉलड्रन, कारा मुरे, जॉर्जिना डेमसे