ICC Womens T20 World Cup : फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण?

येत्या 8 मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यानंतर कोण विश्वविजेता ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ICC Womens T20 World Cup : फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण?
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 5:21 PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला महिला टी-20 वर्ल्ड कप आता (ICC Womens T20 World Cup Final) शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. येत्या 8 मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यानंतर कोण विश्वविजेता ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, जर अंतिम फेरीतही पाऊस पडला तर काय होणार याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघाने (ICC Womens T20 World Cup Final) पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत मजल मारली. तर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान पक्क केलं. मात्र, भारतीय संघाने उपांत्य फेरीत न खेळताच अंतिम फेरीत मजल मारली. कारण, भारत विरुद्ध इंग्लड उपांत्य फेरीत पावसाने खोडा घातल्याने टॉसच्या आधीच तो सामना रद्द करावा लागला.

हेही वाचा : Hardik Pandya | झंझावात, वादळ, धमाका, हार्दिक पंड्याची तुफानी खेळी, 55 चेंडूत 20 षटकार

सामना रद्द झाल्याने भारत आधीच्या कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये दाखल झाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना हा 8 मार्चला मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात सध्या सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे या वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट आहे. जर हा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर विश्वविजेता कोण होणार? हा प्रश्न आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आयसीसी बोर्डाला विनंती केली आहे की, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस (रिझर्व्ह-डे) असावा. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळली. जर 8 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात पाऊस झाला तर हा सामना 9 मार्च राखीव दिवसाला खेळवला जाईल. मात्र, जर सोमवारीही पाऊस झाला आणि सामना रद्द करावा लागला. तर, भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्तपणे विजेता घोषित केलं जाईल.

आयसीसीच्या या नियमाअंतर्गत यापूर्वीही असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यासाठी राखीव दिवस होता. मात्र, राखीव दिवशीही पाऊस पडला. त्यामुळे भारत-श्रीलंकाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.

मेलर्बनमध्ये रविवारी पाऊस होणार नसल्याची शक्यता

मेलर्बनमध्ये रविवारी पाऊस होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कुठल्याही टी-20 सामन्याचा निकाल देण्यासाठी कमीत कमी 10-10 षटकांचा सामना होणे (ICC Womens T20 World Cup Final) आवश्यक आहे. जर 10-10 षटकांचा सामना खेळला गेला नाही तर सामना रद्द केला जातो.

संबंधित बातम्या :

मिताली राज साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात, व्हिडीओ व्हायरल

ICC Womens T20 World Cup : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, विश्वविजयापासून एक पाऊल दूर

हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, 39 चेंडूत 105 धावा, 10 षटकार, चौकार किती?

मैदानावरील आक्रमकता कमी करायला हवी का? पत्रकाराच्या प्रश्नावरच कोहलीचा भडका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.