विश्वचषकात एका डावात 500 धावा होण्याची शक्यता, स्कोअरकार्डही बदललं!
लंडन : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या वन डे मालिकेत धावांचा पाऊस पडतोय. हे लक्षात घेत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्कोअरबोर्ड नव्या स्वरुपात तयार केलंय, ज्यामध्ये एका संघाची धावसंख्या 500 पर्यंत करण्यात आली आहे. प्रिंटेड स्कोअरकार्ड हे इंग्लंडमधील मैदानांचं वैशिष्ट्य आहे. हे स्कोअरकार्ड चाहत्यांना नंतर विकले जातात. डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, प्रेक्षकांद्वारे खरेदी […]
लंडन : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या वन डे मालिकेत धावांचा पाऊस पडतोय. हे लक्षात घेत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्कोअरबोर्ड नव्या स्वरुपात तयार केलंय, ज्यामध्ये एका संघाची धावसंख्या 500 पर्यंत करण्यात आली आहे. प्रिंटेड स्कोअरकार्ड हे इंग्लंडमधील मैदानांचं वैशिष्ट्य आहे. हे स्कोअरकार्ड चाहत्यांना नंतर विकले जातात.
डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, प्रेक्षकांद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या स्कोअरकार्डमध्ये धावांची नोंद असते. विश्वचषकासाठी असे स्कोअरकार्ड तयार करण्यात आले होते, ज्यात धावांची संख्या 400 पर्यंत असू शकते. पण गेल्या आठवड्यात टूर्नामेंटचे निर्देशक स्टीव्ह एलवर्दी यांच्या अंदाजानुसार, नवे स्कोअरकार्ड तयार करण्यात आले आहेत, ज्यानुसार 500 धावाही दाखवल्या जाऊ शकतात.
इंग्लंडने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सहा बाद 481 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध सध्याच्या मालिकेत दुसऱ्या वन डेत इंग्लंडने तीन बाद 373 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने 361 धावा केल्या. यामुळेच या सपाट खेळपट्टीवर 500 धावांचा आकडा गाठणंही शक्य असल्याचं बोललं जातंय.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांच्या मते, स्कोअरकार्डची मर्यादा 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील अंदाज लक्षात घेता स्कोअरकार्ड बदलावे लागले, कुणाला माहित विश्वचषकात 500 धावाही होतील, असं हॅरीसन म्हणाले.