World Cup 2019 : विजय शंकरसाठी गुड न्यूज, पण रिषभ पंतसाठी वेट अँड वॉच

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. भारताचा पुढील सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 22 जूनला म्हणजेच उद्या खेळवला जाणार आहे.

World Cup 2019 : विजय शंकरसाठी गुड न्यूज, पण रिषभ पंतसाठी वेट अँड वॉच
Follow us
| Updated on: Jun 21, 2019 | 10:22 PM

लंडन : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. भारताचा पुढील सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 22 जूनला म्हणजेच उद्या खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय शंकर खेळणार आहे. विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो कदाचित हा सामना खेळू शकणार नाही, असा अंदाज क्रिकेट समीक्षकांकडून वर्तवला जात होता. मात्र, आता खुद्द विजय शंकरने आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी हे मोठं वक्तव्य केलं. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विजय शंकरने तो उद्याचा सामना खेळणार असल्याचं सांगितलं. मात्र, यामुळे रिषभ पंत नक्की नाराज झाला असणार. कारण, आता त्याला विश्वचषकात खेळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

येत्या 22 जूनला शनिवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना इंग्लंडच्या साउथँप्टन या मैदानावर खेळवला जाणार आहे. “मी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार. पाकिस्तानसोबतच्या सामन्यात घेतलेल्या विकेट्समुळे आता माझा आत्मविश्वास वाढला आहे”, असं विजय शंकरने पत्रकार परिषदेत सांगितलं.

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्यानंतर त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळालं. पाकिस्तानसोबतच्या सामन्यात के.एल. राहुलने धवनच्या स्थानावर रोहित शर्मासोबत ओपनिंग केली. तर विजय शंकरला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलं. विजय शंकरचं हे पहिलं विश्वचषक आहे.

भारताच्या प्रॅक्टिस सेशनदरम्यान बुधवारी (19 जून) जसप्रीत बुमराहचा यॉर्कर विजय शंकरच्या पायावर लागला. त्यानंतर त्याला खूप त्रास झाला. या घटनेमुळे विजय शंकर पुढील सामन्यात खेळणार की नाही यावर संशय व्यक्त करण्यात येत होता. जर विजय शंकर अफगाणिस्तानसोबतचा सामना खेळला नसता, तर त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतला संधी मिळाली असती. मात्र, आता विजय शंकर खेळत असल्याने रिषभ पंतला त्याचा खेळ दाखवण्यासाठी वेट अँड वॉच करावा लागणार आहे.

“मी अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्याची वाट पाहतो आहे. जर तुमच्यासमोर नेट्सवर जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज असेल तर तुम्हाला तयार राहायला हवं”, असं विजय शंकरने पत्रकार परिषदेत म्हटलं. गुरुवारच्या प्रॅक्टिसमध्येही दुखापतीनमुळे विजय शंकर येऊ शकला नव्हता.

भारत पाचव्या सानम्यातही शिखर धवनशिवाय उतरणार आहे. अंगठ्याला दुखापत झाल्याने सध्या शिखर धवन हा विश्वचषक खेळू शकत नाही. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतग्रस्त झाल्याने या सामन्यात खेळणार नाही. तो आठ दिवसांपर्यंत खेळू शकणार नाही. भुवी सध्या फिजिओंच्या देखरेखीत आहे. येत्या 30 जूनला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवी खेळण्याची अपेक्षा आहे.

भारताचे पुढील सामने

भारत वि. अफगाणिस्तान, 22 जून

भारत वि. वेस्ट इंडिज, 27 जून

भारत वि. इंग्लंड, 30 जून

भारत वि. बांगलादेश, 02 जुलै

भारत वि. श्रीलंका, 06 जुलै

संबंधित बातम्या :

वर्ल्ड कप: भारतीय संघासाठी खुशखबर, ‘हा’ स्फोटक खेळाडू तंदुरुस्त

2003 चा विश्वचषक विनाविकेटकीपर खेळणाऱ्या भारतीय संघात यंदा पाच विकेटकीपर!

World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!

World Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.