खेळाडूला दुखापत झाली, इंग्लंडचे प्रशिक्षकच क्षेत्ररक्षणासाठी उतरले

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात माजी कर्णधार आणि विद्यमान सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनीच क्षेत्ररक्षणाची धुरा हाती घेतली. गोलंदाज मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्यानंतर शनिवारी कॉलिंगवूड यांनाच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. 42 वर्षीय कॉलिंगवूडला मैदानात पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. आर्चरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. आर्चर स्वतः मार्क वूडला दुखापत झाल्यानंतर त्याच्या […]

खेळाडूला दुखापत झाली, इंग्लंडचे प्रशिक्षकच क्षेत्ररक्षणासाठी उतरले
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 9:06 PM

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात माजी कर्णधार आणि विद्यमान सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनीच क्षेत्ररक्षणाची धुरा हाती घेतली. गोलंदाज मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्यानंतर शनिवारी कॉलिंगवूड यांनाच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. 42 वर्षीय कॉलिंगवूडला मैदानात पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते.

आर्चरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. आर्चर स्वतः मार्क वूडला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी गेला होता. चौथ्या षटकात गोलंदाजी करत असताना वूडचे स्नायू दुखावले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि फिरकीपटू आदिल रशीद खांद्याच्या दुखापतीमुळे अगोदरच सामन्यातून बाहेर होते. अशा परिस्थितीत खुद्द प्रशिक्षकालाच मैदानात उतरावं लागलं.

कॉलिंगवूड यांनी 2001 ते 2011 या काळात इंग्लंडसाठी 197 सामने खेळत 5 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या, शिवाय 111 विकेटही त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी 68 कसोटी सामने आणि 36 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्येही इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. कॉलिंगवूड हे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनही परिचित होते. त्यांनी घेतलेला एक झेल प्रचंड गाजला होता.

VIDEO : कॉलिंगवूड यांनी घेतलेला झेल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.