World Test Championship final 2021 | निवड समितीने ‘या’ 2 कारणांचा विचार केला अन् हार्दिक पांड्याला संघातून डच्चू दिला!
ICC World Test Championship final 2021 Hardik Pandya : हार्दिकची फिटनेस समस्या आणि त्याचा खराब फॉर्म या दोन गोष्टींचा बीसीसीआयने अगदी गांभीर्यपूर्वक विचार केला आणि त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या एकमेव पण महत्वपूर्ण सामन्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. बीसीसीआयने नेमक्या कोणत्या 2 महत्त्वपूर्ण कारणांचा विचार करुन हार्दिक पांड्याला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेतला हे आता पाहूयात…! (ICC World Test Championship final 2021 bad Form And Not Well Fitness Hardik Pandya is not Selected in Team India)
हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म
गेले अनेक दिवस हार्दिक पांड्या त्याच्या फॉर्मशी झगडतो आहे. त्याच्या बॅटमधून गेल्या बऱ्याच दिवसांपासून रन्स निघत नाहीयत. त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात त्याला अपयश येतंय. याची झलक आयपीएलमध्येही बघायला मिळाली. मुंबईकडून खेळताना हार्दिकला आयपीएलमध्ये बऱ्याच वेळा नामी संधी मिळाली पण त्याने त्या संधीचं सोनं केलं नाही.
हार्दिकने आयपीएलच्या 14 व्या मोसमात 7 सामने खेळले. यामध्ये 8.66 च्या सरासरीने तसंच 118.18 च्या स्ट्राईक रेटने त्याने केवळ 52 धावा केल्या. संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा त्याची बॅट बोलली नाही. एवढंच नाही तर आयपीएलच्या 7 सामन्यांत त्याने एकदाही बोलिंग केली नाही. मुंबईच्या संघात केवळ बॅट्समन म्हणूनच तो खेळला.
हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्या
गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पांड्या तंदुरुस्त नाहीय. त्याच्या तब्येतीविषयी सतत बातम्या येत असतात तसंच मैदानावर खेळतानाही त्याच्या तंदुरुस्तीच्या तक्रारी ऐकायला मिळत असतात. हार्दिक पांड्याच्या खांद्याच्या समस्येमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो बोलिंग करत नाहीय. संघात तो केवळ बॅटिंग आणि फिल्डिंग करतोय. मुंबईकडून खेळताना आयपीएलमध्येही त्याने बोलिंग केली नाही. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही त्याने बॉलला स्पर्श केला नाही.
बीसीसीआयचा गांभीर्यपूर्वक विचार
हार्दिक पांड्याला संघातून वगळल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याला का डच्चू दिली असावा? असा प्रश्न सतावत होता. मात्र हार्दिकची फिटनेस समस्या आणि त्याचा खराब फॉर्म या दोन गोष्टींचा बीसीसीआयने अगदी गांभीर्यपूर्वक विचार केला आणि त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.
(ICC World Test Championship final 2021 bad Form And Not Well Fitness Hardik Pandya is not Selected in Team India)
हे ही वाचा :