T20 World Cup 2022: कोरोना झालेल्या खेळाडूंच्याबाबत आयसीसीचा मोठा निर्णय
एखाद्या खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर, त्याबाबत तो संघ निर्णय घेऊ शकतो.
ऑस्ट्रेलियात (Australia) कालपासून क्रिकेटचा रणसंग्राम सुरु झाला आहे. त्यामुळे चाहते सुध्दा सोशल मीडियावर (Social Media) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग अद्याप पुर्णपणे बंद झाला नाही आहे. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. याबाबत आसीसीने (ICC) एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित खेळाडूला देखील क्रिकेट खेळण्याची मुबा देण्यात आली आहे.
खेळाडूंच्या कोरोना टेस्ट घेतल्या जाणार नाहीत. ज्यावेळी एखाद्या खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाल्यास, त्यावेळी त्याची प्रकृती ठिक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे.
एखाद्या खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर, त्याबाबत तो संघ निर्णय घेऊ शकतो. तसेच पुन्हा त्या खेळाडूचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो टीममध्ये समाविष्ट होऊ शकतो.
पुढच्या रविवारी टीम इंडियाची आणि पाकिस्तानची मॅच होणार आहे. त्यामुळे त्याची आत्तापासून चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोन्ही टीमचे चाहते आत्तापासून तर्क लावत आहेत.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.