Rohit Sharma: भारताने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली तर रोहितचं कर्णधारपद जाणार का ?
टीम इंडियाने मालिका गमावल्यास बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, रोहितचं कर्णधारपद जाणार का ?
मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना सुरु झाला. बांगलादेश टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजची मॅच शेर-ए-बांग्ला मैदानात सुरु आहे. आजची मॅच टीम इंडियासाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या मॅचमध्ये टीम इंडिया पराभव झाल्यास बांगलादेशची टीम मालिका जिंकेल. बांगलादेशने पहिली मॅच (Today Match) जिंकल्यामुळे ते मालिकेत आघाडीवर आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आली होती. टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. तेव्हापासून टीम इंडियाच्या कामगिरीवरती अनेक अधिकारी निराश आहेत. तसेच बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
बांगलादेशविरुद्ध सुद्धा टीम इंडियाची खराब कामगिरी झाल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे. कारण टी 20 फॉरमॅटमधील कर्णधारपद हार्दीक पांड्याकडे देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.