… तर ’83’ चे निर्माते 2019 च्या विश्वचषकावरही सिनेमा काढणार
दिग्दर्शक कबीर खान यांच्या 83 चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित आहे.
मुंबई : दिग्दर्शक कबीर खान यांच्या 83 चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित आहे. सध्या विश्वचषक 2019 सुरु आहे. यामध्ये भारताने विजय मिळवला, तर यावरही चित्रपट बनवण्यात येईल, अशी चर्चा सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे.
1983 चित्रपटाचे निर्माते मधू मंटेना म्हणाले, “आम्ही जसे 1983 च्या विश्वचषक विजयावर चित्रपट बनवत आहोत. तसेच भारताने यंदाच्या विश्वचषकात विजय मिळवला, तर यावरही आम्ही चित्रपट बनवू”.
मधू मंटेनाही हा चित्रपट बनवण्यासाठी खूप उत्साहीत आहेत, असं सागितले जात आहे. 83 चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. या चित्रपटात कपिल देव यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह आहे. माजी क्रिकेटर आणि 1983 विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावणारे कपील देव यांची भूमिका करण्यासाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून त्यावेळचे प्रसंग समजून घेत आहे.
कबीर खान यांच्या 83 चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग तसेच साकिब सलीम, आर बद्री, हार्डी संधू, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, अम्मी विर्क आणि साहिल खट्टर हे प्रमूख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्यावर्षी 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.