T20 World Cup 2022 : असे झाल्यास भारतीय संघ यावेळी टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल ?
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये विराट कोहली, हार्दीक पांड्या, सुर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी केली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात येत्या रविवारी पहिली टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2022) मॅच होणार आहे. त्यामुळे आत्तापासून टीम इंडियाच्या खेळाडूंची चर्चा सुरु झाली आहे. कारण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सुरेश रैनाने काल एक भविष्यवाणी सुद्धा वर्तवली आहे.
सुरेश रैना एनडीटिव्हीशी बोलताना जाहीर केलं आहे, की समजा टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धची पहिली मॅच जिंकल असेल तर टीम इंडिया विश्वचषक जिंकेल. कालच्या मॅचमध्ये शमीने चार विकेट घेतल्यापासून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर बुमराहची भूमिका निभावण्यास शमी तयार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये विराट कोहली, हार्दीक पांड्या, सुर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच झालेल्या तीन सराव सामन्यात सुद्धा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदाचा विश्वचषक जिंकू शकते असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.