Yuvraj Singh: गोवा सरकारकडून युवराज सिंगला नोटीस, मोठा दंड होण्याची शक्यता
युवराज सिंगच्या अडचणीत वाढ, गोवा सरकारची नोटीस, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे ?
मुंबई : टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगला (Yuvraj Singh) गोव्याच्या (Goa) सरकारकडून एक नोटीस देण्यात आली. त्यामुळे युवराज सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणचे गोवा सरकारने कडक कारवाई केल्यास मोठा दंड भरावा लागेल अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. गोवा सरकारने अशी अनेकांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये युवराज सिंगचं सुद्धा नाव आहे. युवराच सिंगचं त्या यादीत नाव आल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु झाली आहे.
युवराज सिंगचा गोव्यात बंगला आहे. तो बंगला त्याने चाहत्यांना भाड्याने द्यायचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही गोष्ट चाहत्यांना शेअर केली आहे. त्या बंगल्याचं नावं कासा सिंह असं आहे. विशेष म्हणजे युवराज सिंग भाड्याने बंगला देणार असल्याची माहिती गोवा पर्यटन विभागाच्या कानावर गेली. तेव्हापासून विभाग युवराजच्या बंगल्यावर लक्ष ठेवून होते.
गोवा पर्यटन विभागाची कसल्याही प्रकारची माहिती परवानगी न घेता युवराज सिंग भाड्याने बंगला देत असल्यामुळे त्याला नोटीस देण्यात आली आहे. पर्यटन विभागाने कारवाई केल्यास लाखो रुपयांचा दंड त्याला भरावा लागेल.
गोवा पर्यटन विभागाचे डायरेक्टर निखिल देसाई यांनी आतापर्यंत बंगला भाड्यांनी देण्यासाठी ज्यांनी परवानगी घेतलेली नाही, त्यांना नोटीस देण्यात आली आहे. 400 घर मालकांची यादी असल्याची सुध्दा माहिती देसाई यांनी दिली आहेय.