Ind Vs Aus : अजिंक्य स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करेल, मराठमोळ्या रहाणेवर विराटला विश्वास
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.
अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020) यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अॅडिलेड येथे खेळण्यात येणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या मालिकेत स्वत:ला उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध करेल. या मालिकेत टीम इंडिया कुठेच कमी पडणार नाही, याबाबतची पूर्ण काळजी अजिंक्य घेईल, अशा शब्दात विराट कोहलीने (Virat Kohli) मराठमोळ्या अजिंक्यवर विश्वास दर्शवला. विराट पहिल्या कसोटी सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता. Ind vs Aus 2020 Ajinkya Rahane will prove himself as captain Virat Kohli believes
विराट काय म्हणाला?
“माझ्या मते अजिंक्य स्वत:ला उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध करेल. अजिंक्यने याआधीही टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. अजिंक्यने नेतृत्व करताना चांगली कामगिरी केली आहे. अजिंक्य एक चांगला फलंदाजही आहे. अजिंक्य नक्कीच स्वत:ला बॅटिंग आणि नेतृत्वात सिद्ध करेल. टीम इंडिया प्रत्येक बाबतीत कुठेच कमी पडणार नाही, याची काळजी अजिंक्य निश्चित घेईल. मला अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे”, अशा शब्दात विराटने मराठमोळ्या अजिंक्यवर विश्वास दर्शवला.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडिलेडमध्ये खेळण्यात येणार आहे. या मालिकेआधी एका पत्रकार परिषेदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत विराट बोलत होता. विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामुळे तो भारतात परतणार आहे. यानंतरच्या उर्वरित 3 सामन्यांसाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.
विराटच्या पत्रकार-परिषदेतील मुद्दे
– पिंक बॉल टेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान आमच्यासमोर असेल. मागील दौऱ्याच्या तुलनेत यावेळेस आव्हान वेगळं असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आल्यानंतर दरवेळेस आमच्यसमोर वेगवेगळी आव्हानं असतात. पण आमचं लक्ष फक्त चांगली खेळी करण्याकडेच असेल.
-शुभमन गिलला अद्याप संधी मिळाली नाही. शुभमन प्रतिभावान खेळाडू आहे. तो कशाप्रकारे खेळी करतो, हे मी पाहु इच्छितो. तसेच पृथ्वी शॉ याला कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे. मात्र तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळतोय. मी या प्रतिभावान खेळाडूंना संधी देऊ इच्छितो.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
IND Vs AUS : कर्णधार विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी
PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू
Ind vs Aus 2020 Ajinkya Rahane will prove himself as captain Virat Kohli believes