India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक,  अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 5:43 PM

सिडनी : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. Ind vs Aus 2020 india vs australia 2nd t 20 live score update लाईव्ह स्कोअर

विजयी आव्हानाचं सुरुवात करायला आलेल्या टीम इंडियाची आश्वासक सुरुवात झाली. शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने 56 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर केएल राहुल बाद झाला. केएलने 22 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह 30 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. धवन-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. यादरम्यान गब्बर शिखरने आपले अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकानंतर शिखर धवन आऊट झाला. धवनने 36 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह तडाखेदार 52 धावा केल्या.

धवननंतर संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. संजूला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. संजू 15 धावांवर माघारी परतला. संजूनंतर हार्दिक मैदानात आला. संजू बाद झाल्यानंतर काही ओव्हरनंतर कर्णधार विराटही निर्णायक क्षणी बाद झाला. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला.

विराटनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी विजयी भागीदारी केली. हार्दिक आणि श्रेयसने पाचव्या विकेटसाठी नाबाद 46 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 42 श्रेयस अय्यरने नाबाद 12 धावा केल्या.

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. ऑस्ट्र्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या. वेडने 32 चेंडूत 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 58 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 46 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मोईसेस हेनरिकेसने छोटेखानी पण महत्वाची खेळी केली. मॅक्सवेल आणि हेनरिकेसने प्रत्येकी 22 आणि 26 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून थंगारासू नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

[svt-event title=”टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय ” date=”06/12/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता” date=”06/12/2020,5:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला विजयासाठी 12 चेंडूत 25 धावांची आवश्यकता” date=”06/12/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला मोठा धक्का” date=”06/12/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला तिसरा धक्का” date=”06/12/2020,4:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला दुसरा धक्का” date=”06/12/2020,4:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘गब्बर’ शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण ” date=”06/12/2020,4:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 109 धावांची आवश्यकता” date=”06/12/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला पहिला धक्का” date=”06/12/2020,4:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” शिखर धवन-केएल राहुल जोडीची सलामी अर्धशतकी भागीदारी” date=”06/12/2020,4:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/12/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान ” date=”06/12/2020,3:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का” date=”06/12/2020,3:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का” date=”06/12/2020,3:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डार्सी शॉट आऊट” date=”06/12/2020,2:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/12/2020,1:50PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेडकडे” date=”06/12/2020,1:57PM” class=”svt-cd-green” ] कर्णधार अॅरॉन फिंच दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची जबाबदारी मॅथ्यू वेडला देण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन” date=”06/12/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाचा अंतिम 11 संघ” date=”06/12/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाने टॉस जिंकला” date=”06/12/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

रवींद्र जाडेजाची उणीव भासणार

पहिल्या टी 20 सामन्यात बॅटिंगदरम्यान रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) उजव्या माडींचे स्नायू दुखावले. तसेच हेल्मेटला चेंडू लागला. त्यामुळे जाडेजाला या टी 20 मालिकेला मुकावे लागले. जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत आणि पहिल्या टी 20 सामन्यातही निर्णायक कामगिरी केली. त्यामुळे जाडेजाची उर्वरित 2 सामन्यांमध्ये त्याची उणीव भासणार आहे. जाडेजाच्या बदल्यात संघात गोलंदाज शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे.

विराट-पांड्यावर जबाबदारी

जाडेजाच्या अनुपस्थितीत कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) आणि हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) अधिकची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या दोघांकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू समॅसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकुर.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एलेक्स कॅरी, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सैम्स, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, अॅडम झॅम्पा, मिशेल स्वेपसन आणि नॅथन लायन.

संबंधित बातम्या :

India vs Australia 1st T20 Update : टीम इंडियाची विजयी सलामी,ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

Ind vs Aus 2020 india vs australia 2nd t 20 live score update

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.