‘माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट…’, मॅच ड्रॉ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया

सामना संपल्यानंतर माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट होता, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने दिली.

'माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट...', मॅच ड्रॉ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 9:50 PM

सिडनी :   ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिला. निर्णायक क्षणी टीम इंडियाच्या अश्विन (R Ashwin) आणि हनुमा विहारीने (Hanuma Vihari) महत्वाची भागीदारी केली. अश्विन आणि विहारीने कांगारुंना आपल्या डिफेन्सिव खेळीने त्रस्त केलं तथा शेवटपर्यंत आऊट झाले नाहीत. ही मॅच ड्रॉ करायला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा (Tim Paine) देखील महत्त्वाचा वाटा आहे. तो असा की, त्याने भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांचे स्टम्पमागे कॅच सोडले. त्याच्या याच निराशाजनक खेळीचं त्याचं त्यालाच वाईट वाटतंय. सामना संपल्यानंतर माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट होता, अशी प्रतिक्रिया टीम पेन याने दिली. (Ind Vs aus 3rd test Australia Captain tim Paine regret for His Mistake)

ऑस्ट्रेलियन संघाचा विकेटकीपर कर्णधार टीम पेनने रिषभ पंतचे दोन कॅच सोडले. त्याच रिषभने आक्रमक फलंदाजी करुन भारताला विजयाची स्वप्न दाखवली. रिषभने 119 बॉलमध्ये तडाखेबाज 97 धावा केल्या. रिषभचा कॅच ऑस्ट्रेलियाला खूपच महागात पडला. दुखापतीने त्रस्त झालेला असूनही आपल्या जिगरबाज खेळीचं दर्शन घडवणाऱ्या हनुमा विहारीचा कॅचही टीम पेनने सोडला. त्याच विहारीने शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहून अश्विनच्या साथीने सामना अनिर्णित केला.

“निश्चितपणाने मी सोडलेल्या कॅचेसचा या मॅचच्या रिझल्टवर परिणाम झाला. जर कदाचित ते कॅच मी घेतले असते तर मॅचचा रिझल्ट नक्कीच वेगळा दिसला असता. मी आज खूप निराश आहे. माझ्या आयुष्यातील आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता, असं मी म्हणेन. माझ्या विकेट कीपिंगवर मला गर्व आहे. परंतु आज माझ्याकडून चुका झाल्या”, अशा शब्दात त्याने झालेल्या चुकांची कबुली मॅच पार पडल्यानंतरच्या प्रेसमध्ये दिली.

“आमच्या जलदगती गोलंदाजांनी तसंच ऑफस्पिनगर नॅथन लायनने जिगरबाज बोलिंग केली. मला निश्चितपणाने वाटतं की मी त्यांना निराश केलंय, असंही टीम पेन म्हणाला. तसंच पुढच्या आठवड्यात झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी मला ब्रिसबेनला मिळणार आहे. त्यामुळे मी आता यापुढचा विचार करतोय”, असंही पेन म्हणाला.

मला भारतीय टीमचा अभिमान- रहाणे

“आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्याबद्दल मला संपूर्ण संघाचा फार अभिमान आहे. टीम इंडियाने चांगला खेळ केला. अॅडिलेड आणि मेलबर्न या पहिल्या दोन सामन्यात परिस्थिती वेगळी होती. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने परिस्थितीनुसार कामगिरी केली. मेलबर्नमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत जोरदार पुनरागमन केलं. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात मजबूत स्थितीत होती. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी कांगारुंना दणका दिला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर गुंडाळला. याच सर्व श्रेय गोलंदाजांचं आहे”, असं म्हणत रहाणेने टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं.

निकालाची पर्वा नव्हती, फक्त झुंज द्यावी इतकंच मला वाटायचं……

निकालाची चिंता न करता कांगारुंना तगडी झुंज द्यावी, इतकंच मला वाटत होतं. निकाल कधीच आपल्या हातात नसतो. मी यावर विश्वास ठेवतो. आपल्या हातात कधीच निकाल नसतो. पण आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवेत. तुम्ही पूर्ण समर्पणाने खेळायला हवं, हे मी क्रिकेटमधूनच शिकलोय”, असंही रहाणेने नमूद केलं.

(Ind Vs aus 3rd test Australia Captain tim Paine regret for His Mistake)

संबंधित बातम्या

Aus vs Ind 3rd Test | नगरी भाषेत रहाणे म्हणाला, निकालाची पर्वा नव्हती, शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं!

विराट अनुष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन, वाचा विराट अनुष्काची डोळे दिपवणारी ‘लक्ष्मी’!

Australia vs India, 3rd Test | आज पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटतंय, झुंजार खेळीनंतर अश्विनची प्रतिक्रिया

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.