IND vs AUS 3rd Test | रविंद्र जडेजाचं बॅड लक! लाबुशेनला केलं क्लिन बोल्ड पण झालं असं की…, Watch Video
बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला चांगलाच दणका दिला. पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ 109 धावांवर बाद केला. तर गोलंदाजीत रविंद्र जडेजाची एक चूक चांगलीच भोवली.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं आहे. भारताला कसोटीच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका दिला. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच संपूर्ण संघ 109 धावांवर तंबूत पाठवला. कोणताच खेळाडू साजेशी कामगिरी करू शकला नाही. तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतानं दिलेल्या धावा पार करत आता आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमवून भारताचं 109 धावांचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे. रविंद्र जडेजाने मार्नश लाबुशेनला क्लिन बोल्डही केलं. पण जडेजा एक चूक भोवली आणि पुन्हा खेळपट्टीवर परतला.
भारताने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या 12 धावा असताना पहिला धक्का बसला. ट्रविस हेड अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. रविंद्र जडेजाने त्याला पायचीत केलं. त्यानंतर मार्नस लाबुशेनला शुन्यावर बाद केलं. मात्र नो बॉल असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजन पडलं. लाबुशेन बाद झाल्यानंतर तंबूत परतत होता. मात्र पंचांनी त्याला थांबण्यास सांगितलं आणि नो बॉल चेक करण्यास सांगितलं. तेव्हा जडेजाने ओव्हरस्टेप केल्याचं दिसून आलं आणि त्याला जीवनदान मिळालं.
— cricket fan (@cricketfanvideo) March 1, 2023
चौथ्या षटकातच भारताला दुसरं यश मिळलं असतं. पण दुर्दैवाने नो बॉलमुळे संधी हुकली. या संधीचा उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या दोघांनी फायदा घेतला. दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मार्नस 91 चेंडूत 31 धावा करून तंबूत परतला. त्याला रविंद्र जडेजानेच त्रिफळाचीत केलं.
रविंद्र जडेजाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. जडेजाने या स्पर्धेता आतापर्यंत 18 गडी बाद केले आहेत. ही संख्या आता 20 असू शकली असती. नो बॉलमुळे रविंद्र जडेजाचं हे गणित फिस्कटलं. रविंद्र जडेजाने या स्पर्धेत आतापर्यंत 8 नो बॉल टाकले आहेत. जडेजाने तिसऱ्या कसोटीत लाबुशेनची विकेट नो बॉलमुळे गमावली. तर पहिल्या नागपूर टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथला नो बॉलमुळे जीवदान मिळालं होतं.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.