Ind vs Aus : कांगारुंना हरवायचं तर किती रन्स पाहिजे?, अजय जडेजाने सांगितला एक्झॅट आकडा!

भारताला सिडनी टेस्ट मॅच जिंकायची असेल तर किती रन्स कराव्या लागतील किंबहुना तो आकडा काय असेल याचा अंदाज भारताचा माजी खेळाडू अजय जडेजाने सांगितला आहे.

Ind vs Aus : कांगारुंना हरवायचं तर किती रन्स पाहिजे?, अजय जडेजाने सांगितला एक्झॅट आकडा!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 6:57 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind 3rd Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा 9 आणि कर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावांवर नाबाद होते. टीम इंडियाने दिवसखेर 2 विकेट्स गमावून 96 धावा केल्या आहेत. भारताला सिडनी टेस्ट मॅच जिंकायची असेल तर किती रन्स कराव्या लागतील किंबहुना तो आकडा काय असेल याचा अंदाज भारताचा माजी खेळाडू अजय जडेजाने (Ajay Jadeja) सांगितला आहे. (Ind Vs Aus Ajay jadeja tell Thats the score Australia needs to beat)

इंग्लंडचा माजी खेळाडू निक नाईट आणि अजय जडेजा चॅनलवर कॉमेन्ट्री करत असताना त्यांच्या संभाषणादरम्यान जडेजा म्हणाला, “भारताच्या फलंदाजांनी 400 ते 450 रन्सपर्यंत मजल मारायला हवी. दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या दोन विकेट जाऊन 96 रन्स झाल्या आहेत. आणखी भारताच्या हातात 8 विकेट्स आहेत. भारतीय फलंदाजांनी संयमाने खेळी केली तर 400 ते 450 धावा होतील, याच धावा ऑस्ट्रेलियाचं धैर्य कमी करतील. तसंच दुसऱ्या डावात खेळताना हेच 150 धावांचं लीड तोडण्यात त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतील, या सगळ्यात त्यांच्या जर विकेट गेल्या तर भारताचा विजय अधिक सोपा होईल”.

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या 338 रन्सचा विचार करुन भारताने खेळू नये तर त्यांच्यापेक्षा 100 ते 150 धावा अधिक हव्यात, असा विचार भारतीय फलंदाजांनी करायला हवा. मेलबर्न कसोटीचा हिरो कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारताची वॉल चेतेश्वर पुजारा जर खेळपट्टीवर टिकले तर भारत 400 धावांचा टप्पा पार करेल, असा आशावादही जडेजाने व्यक्त केला.

तत्पूर्वी तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा 9 आणि कर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावांवर नाबाद होते. टीम इंडियाने दिवसखेर 2 विकेट्स गमावून 96 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शुभमन आणि रोहित दोघेही सेट झाले. मात्र हेझलवूडने रोहितला आपल्याच गोलंदाजीवर आऊट केलं. रोहितने 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा केल्या.

रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजारासह गिलने स्कोअरबोर्ड हलता ठेवला. यादरम्यान गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतकी खेळीनंतर गिल आऊट झाला. गिलने 101 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा केल्या. गिलनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर शिल्लक होत्या. यामुळे रहाणे-पुजारा या जोडीने संथ खेळ केला. या पुजारा आणि रहाणे या दोघांनी दिवसखेर नाबाद प्रत्येकी 9 आणि 5 धावा केल्या. (Ind Vs Aus Ajay jadeja tell Thats the score Australia needs to beat)

संबंधित बातम्या

Australia vs India, 3rd Test, 2nd Day Stumps : शुभमन गिलची अर्धशतकी खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 2 बाद 96 धावा

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.