पाँन्टिंगपाठोपाठ बॉर्डर यांचंही पुजाराच्या खेळाकडे बोट, टॉम मूडींनी असा केला बचाव!

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक म्हणून ओळखला जातो.

पाँन्टिंगपाठोपाठ बॉर्डर यांचंही पुजाराच्या खेळाकडे बोट, टॉम मूडींनी असा केला बचाव!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 9:03 PM

सिडनीचेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक म्हणून ओळखला जातो. पुजारा टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज आहे. टीम इंडिया अडचणीत असते, तेव्हा पुजारा निर्णायक भूमिका बजावतो. ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी (Aus vs Ind 3rd Test) असंच पाहायला मिळालं. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‌ॅलन बॉर्डर यांनी पुजाराच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पुजारा शॉट खेळताना घाबरत होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या टीकेला ऑस्ट्रेलियाचे ऑलराऊंडर टॉम मूडी यांनी उत्तर दिलंय. पुजारा त्याचा नैसर्गिक खेळ खेळला. तो दबावात किंवा घाबरुन खेळला असं मला वाटत नाही, असं प्रत्युत्तर मूडी यांनी दिलंय. (Ind Vs Aus Allan border And Tom moody Contradictory View Over Cheteshwar Pujara)

पुजारावर टीका करताना अ‌ॅलन बॉर्डर म्हणाले, “या मालिकेत पुजाराचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. तिसऱ्या कसोटीत त्याने रन्स करायला इतका वेळ घेतला की त्याचा परिणाम त्याच्या सोबतच्या भारतीय फलंजादांवर झाला. ऑस्ट्रेलियन बोलर्सवर तो हावी होतोय, असं अजिबातच दिसलं नाही. ऑस्ट्रेलियन बोलर्सनी टिच्चून मारा केला. त्यामुळे भारती बॅट्समन दबावातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे भारतीय फलंदाज संथ गतीने खेळले.

बॉर्डर यांना उत्तर देताना मूडी म्हणाले, “मला वाटतं नाही ती दोषी फक्त पुजाराच आहे. पुजाराने त्याच्या नेहमीचा नैसर्गिक खेळ केला. धावफलक हलता ठेवण्याचं काम हनुमा विहारी आणि कर्धार अजिंक्य रहाणेंही होतं”

पॉन्टिंगचाही पुजारावर निशाणा

पुजाराने पहिल्या डावात झुंजार अर्धशतक केलं. मात्र यानंतरही पॉन्टिंगने पुजारावर निशाणा का साधला, असा प्रश्न पुजारा समर्थकांना पडला आहे. पुजारावर टीका करण्याचं कारणही तसंच आहे. पुजाराने अतिशय संथ खेळी केली. यावरुन पॉन्टिंगने पुजाराला लक्ष्य केलं आहे. ” पुजारा फार सावकाश खेळला. यामुळे या संथ खेळीचा दबाव इतर फलंदाजांवर आला. पुजाराने असं करायला नको. पुजाराने खेळात वेग वाढवायला हवा. पुजारा सध्या जसा खेळतोय, त्याबाबत त्याने आत्मचिंतन करायला हवं”, असं पॉन्टिंग म्हणाला.

पुजाराच्या 176 चेंडूत 50 धावा

पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. पुजाराने एकूण 176 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार लगावले. विशेष म्हणजे पुजाराने या पहिल्या 100 चेंडूमध्ये विना चौकार अवघ्या 16 धावा केल्या.

कमिन्सची ठरलेली विकेट

पॅट कमिन्सच (Pat Cummins) पुजाराला आऊट करणार, असं समीकरण या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत तयार झालं आहे. या मालिकेत पॅटने पुजाराला 5 पैकी एकूण 4 वेळा आऊट केलं आहे.

टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. पुजारा या विजयाचा हिरो ठरला होता. पुजाराने या कसोटी मालिकेत एकूण 3 शतक लगावले होते. मात्र यंदाच्या दौऱ्यात पुजाराला आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरोधातील या कसोटी मालिकेत आतापर्यंत 5 डावात अवघ्या 113 धावा केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतकाचा समावेश आहे.

तिसऱ्या सामन्याची थोडक्यात माहिती

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 338 धावा केल्या. यानंतर कांगारुंनी भारताचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. यामुळे ऑस्ट्रेलियााला दुसऱ्या डावात 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसखेर 2 विकेट गमावून 103 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे.

संबंधित बातम्या

Aus vs Ind 3Rd Test | “पुजारामुळे टीम इंडियाची पहिल्या डावात वाताहात झाली”, झुंजार अर्धशतकानंतरही ‘या’ दिग्गाचा घणाघात

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.