नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेमधील भारताने (IND vs AUS First Test Match) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या नागपूर कसोटीमध्ये भारताने वर्चस्व राखलं आहे. पहिल्या दिवशी कांगारूंचा 177 धावात खुर्दा पाडला. यामध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण करणाऱ्या सर जडेजाने आपली जादू दाखवून दिली. एकट्या जडेजाने 5 विकेट्स घेत संघाला अर्ध्या माघारी धाडत पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकललं. आजच्या सामन्यामध्ये भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोन खेळाडूंनी पदार्पण केलं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीमधील एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (KS Bharat Mother Pic)
हा व्हायरल होत असलेला फोटो दुसरा तिसरा कोणी नाहीतर भारताचा खेळाडू केएस भरतचा आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यावर दोघा माय-लेकाचा फोटो जोरदार व्हायरल आहे. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूची मेहनत फळाला आली होती. कोशिश करनो वालो की कभी हार नही होती…या वाक्याप्रमाणे केएसच्या जिद्द आणि चिकाटीला खऱ्या अर्थाने आज यश आलं होतं. संधी मिळाल्यावर त्या संधीचं सोनं त्याने केलंच.
Ks Bharat receives his test cap from Cheteshwar Pujara. #BGT2023#INDvsAUSpic.twitter.com/dmLRvRxMD1
— Cricket Guruji (@CricketGuruji6) February 9, 2023
केएसने आज पदार्पण केलं त्यावेळी त्याची आईसुद्धा नागपूरला होती. देशातून अकरा जणांमध्ये आपल्या लेकाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाल्यावर आईच्या आनंदाचा ठावठिकाणा राहिला नाही. थेट मैदानात जात आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि गालाचा मुका घेतला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकंच नाहीतर भरतने आपल्या अंगावर आईच्या आणि वडिलांच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे. कोना देवी असं भरतच्या आईचं नाव आहे.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केएस भरतने आतापर्यंत 86 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 37.95 च्या सरासरीने एकूण 4707 धावा केल्या आहेत. त्यासोबतच याशिवाय त्याने 64 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याच्या एकूण 1950 धावा आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.