IND vs AUS : थर्ड अंपायरने भारताला DRS घेण्यापासून रोखले, ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून संधीचं सोनं

अखेरचा टी-20 सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेचा शेवट गोड केला. तर भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

IND vs AUS : थर्ड अंपायरने भारताला DRS घेण्यापासून रोखले, ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून संधीचं सोनं
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 8:36 AM

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसरा आणि अखेरच्या टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकण्यासाठी 187 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताला हे लक्ष्य पार करण्यात अपयश आलं. भारताने निर्धारित 20 षटकात 07 बाद 174 इतक्या धावा केल्या. तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने या मालिकेचा शेवट गोड केला. कप्तान विराट कोहलीची झुंजार 85 धावांची खेळी व्यर्थ गेली. भारताने 3 टी-20 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. दरम्यान, या सामन्यात एक वेगळा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिल्यांदाच तिसऱ्या पंचांनी एखाद्या कर्णधारास डीआरएस घेण्यापासून रोखण्याचा प्रकार आज घडला. (IND vs AUS : Matthew wade LBW DRS controversy in Sydney T20I, Virat Kohli was not happy)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) आज जबरदस्त फॉर्मात होता. सामन्यातील 11 व्या षटकात टी. नटराजनचा एक चेंडू वेडच्या पॅडवर जाऊन आदळला. यावेळी भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, परंतु अंपायर रॉड टकरने हे अपिल फेटाळून लावले. दरम्यान भारतीय खेळाडू आपसात चर्चा करत होते. त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने डीआरएस मागितला. तोपर्यंत नटराजन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता. तसेच ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेल अंपायर्सना म्हणाला की, स्टेडियमध्ये लावलेल्या स्क्रीनवर रिप्ले दाखवला आहे. त्यादरम्यान तिसरे पंच पॉल विल्सनदेखील रिव्ह्यू पाहात होते. परंतु त्यांनी मध्येच हा रिव्ह्यू रोखला. की हा रिव्ह्यू चुकीचा आहे. दरम्यान ही गोष्टदेखील स्पष्ट होऊ शकलेली नाही की, डीआरएस मागण्यासाठी दिलेल्या 15 सेकंदांपूर्वीच रिप्ले दाखवण्यात आला होता का? की विराटने रिव्ह्यू मागण्यासाठी उशीर केला.

कांगारुंची 186 धावांपर्यंत मजल

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा ऑस्ट्रेलियन फलंदाच मॅथ्यू वेडला खूप फायदा झाला. तो बाद असूनही त्याला बाद घोषित केले नाही. भारतीय खेळाडूंनी अपील केलं तेव्हा वेड 35 चेंडूत 50 धावांवर खेळत होता. त्यानंतर तो पुढील आठ षटके मैदानात उभा होता 19 व्या षटकात वेड 80 धावांवर बाद झाला. त्याने 53 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 80 धावा चोपल्या. वेडच्या 80 आणि ग्लेन मॅक्सवेलच्या 54 धावांच्या जोरावर कांगारुंच्या संघाने 5 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचा 12 धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर के. एल. राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने धावफलक हालता ठेवला. अधूनमधून शिखर-विराट आक्रमक फटके खेळत होते. मात्र असाच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात शिखर धवन झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 28 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं.

विराटची खेळी व्यर्थ

विराट आणि हार्दिक पांड्याने सोळाव्या आणि सतराव्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार लगावत मॅचची उत्कंठा वाढवली. परंतु चुकीचा फटका खेळत हार्दिक पांड्या आऊट झाला. अ‌ॅडम झम्पाने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर एकट्या विराट कोहलीवर सगळी मदार होती. भारताला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 42 धावांची आवश्यकता होती. मात्र आवश्यक धावगती वाढवण्याच्या नादात विराट कोहलीदेखील 85 धावांवर बाद झाला. सरतेशेवटी भारताला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्वेप्सनने सर्वाधिक 3 बळी घेतले. ग्लेन मॅक्सवेल, सिन अॅबॉट आणि अँड्र्यू टायने प्रत्येकी एक-एक बळी घेत मिशेलला चांगली साथ दिली.

संबंधित बातम्या

विराट कोहलीने रचला इतिहास, हा जबरदस्त रेकॉर्ड करणारा दुसरा भारतीय बॅट्समन

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील प्रत्येक बाउंड्रीला एक चुंबन देईन, बॅनर घेऊन आलेल्या मुलीचा फोटो चर्चेत

(IND vs AUS : Matthew wade LBW DRS controversy in Sydney T20I, Virat Kohli was not happy)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.