Ind Vs Aus : मोहम्मद सिराजच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, सामना सुरु असताना असं घडलं की…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे, त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. त्यात भारतीय क्रीडाप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
मुंबई : चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा आणि शेवटचा सामना सुरु आहे. हा सामना सुरु असतानाच टीम इंडिया आणि मोहम्मद सिराजसाठी वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या सध्याच्या रॅकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे. वनडे फॉर्मेटमध्ये मोहम्मद सिराज नंबर एकचा गोलंदाज होता. मात्र तीन वनडे सामन्यातील कामगिरी पाहता त्याचं अव्वल स्थान हातून गेलं आहे.सिराजला ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूमुळे हा फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनं सिराजचं वनडे रॅकिंगमधलं अव्वल स्थान हिसकावून घेतलं आहे. आता हेझलवूड नंबर एक गोलंदाज आहे आणि सिराजची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलँडचा ट्रेंट बोल्ट आहे. सिराजसोबत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क संयुक्तिकपणे तिसऱ्या स्थानावर आहे. हेझलवूड सध्या भारत दौऱ्यावर नाही मात्र तरीही त्याला अव्वल स्थान मिळालं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन वनडे सामन्यात सिराजला हवी तशी कामगिरी करता आली नाही. मुंबई खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात तीन गडी बाद केले होते. तर विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही. तिसऱ्या वनडेत दोन गडी बाद करण्यात यश आले. म्हणजेच तीन सामन्यात एकूण पाचच गडी बाद केले. त्याच्या व्यतिरिक्त टॉप 10 मध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही.
फलंदाजी राँकिंगमध्ये मुंबईत अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलला फायदा झाला आहे. त्याने 74 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे तीन क्रमांकाची उडी घेत 39 वं स्थान गाठलं आहे. तर रोहित शर्माला वनडे रँकिंगमध्ये नवव्या स्थानी, विराट कोहली आठव्या स्थानी आणि शुभमन गिल पाचव्या स्थानी आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन 399 गुणांसह अव्वल स्थानी आहे. या क्रमवारीत भारताचा एकही खेळाडू नहाी. दुसऱ्या स्थानी मोहम्मद नबी (अफगाणिस्तान), तिसऱ्या स्थानी राशिद खान (अफगाणिस्तान), चौथ्या स्थानी मिशेल सँनटनर (न्यूझीलँड), पाचव्या स्थानी महेदी हसन (बांगलादेश), सहाव्या स्थानी सिकंदर राजा (झिम्बाब्वे), सातव्या स्थानी वनिंदू हसरंगा (श्रीलंका), आठव्या स्थानी झीशान मकसूद (ओमान), नवव्या स्थानी अस्साद वाला (पीएनजी), धनंजय डिसिल्वा (श्रीलंका) अशी क्रमवारी आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.