पृथ्वी, साहाचं गचाळ क्षेत्ररक्षण, विराटचा हवेत झेपावत कॅच!
एका बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी मानर्स लाबूशानेचा तब्बल 3 वेळा कॅच सोडला. अपवाद कर्णधार विराट कोहलीने ग्रीनचा हवेत उडत कॅच घेतला.
अॅडलेड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला कसोटी सामना (Australia vs India 1st Test) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 233 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरीत करत कांगारुंना झटके दिले. एका बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी मानर्स लाबूशानेचा तब्बल 3 वेळा कॅच सोडला. बुमराह, साहा आणि पृथ्वीने गचाळ क्षेत्ररक्षण करत कॅच सोडले. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हवेत झेपावत कॅमरुन ग्रीनला तंबूत पाठवलं. (Ind Vs Aus prithvi Saha dropped Catches Virat kohli outstanding Catch)
रवीचंद्रन आश्विन सामन्याची 41 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फटका मारला. शॉर्ट मिड विकेटला विराट होता. आपल्या दिशेने येत असलेला चेंडू विराटने पाहिला. विराटला चेंडूपासून आपण दूर असल्याचं जाणवलं. विराटने वेळ न दवडता हवेत झेप घेतली. यासह विराटने अफलातून कॅच घेतला.
King kohli pic.twitter.com/U6mDyTDJRX
— chaitanya (@chaitu_20) December 18, 2020
नक्की काय झालं?
मार्नसला आधी विकेटकीपर ऋद्धीमान साहा तर दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराहने जीवनदान दिलं. मॅथ्यू वेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला. वेड 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आऊट झाला. वेडनंतर मार्नस मैदानात आला. मार्नस मैदानात आला तेव्हा तो दबावात वाटत होता. याचाच फायदा बुमराहने घेतला. बुमराहने 15 व्या ओव्हरचा चौथा चेंडू टाकला. बुमराहने टाकलेला चेंडू मार्नसच्या बॅटला लागून विकेटकीपर ऋद्धीमान आणि पहिल्या स्लीपमध्ये असलेल्या विराटच्या दिशेने गेला. मात्र हा कॅच घेण्यात दोनही अपयशी ठरले. त्यामुळे मार्नसला पहिलं जीवनदान मिळालं.
Poor from Saha…didn’t even get a glove on that.
FOLLOW #AUSvIND LIVE: ? https://t.co/nrSvVZVdjZ ? #INDvAUS pic.twitter.com/MDAzQ13pyG
— ?FlashScore Cricket Commentators (@FlashCric) December 18, 2020
मार्नसला यानंतर सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये दुसरा जीवनदान मिळालं. मार्नसने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर लेग साईडला उंच शॉट खेचला. सीमारेषेवर बुमराह उभा होता. बुमराहने कॅचचा वेध घेतला. मात्र बुमराहच्या हातून कॅच निसटला. त्यामुळे मार्नसला दुसरा जीवनदान मिळाला.
Dropped! Labuschagne gets a life on 12! #AUSvIND live: https://t.co/LGCJ7zSdrY pic.twitter.com/ooHxon8aCE
— cricket.com.au (@cricketcomau) December 18, 2020
(Ind Vs Aus prithvi Saha dropped Catches Virat kohli outstanding Catch)
संबंधित बातम्या
Australia vs India, 1st Test | ‘उडता’ विराट, कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहिलात का?
Virat Kohli | अर्धशतकांचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा, कोहलीची ‘विराट’ खेळी