Ind Vs Aus : भर मैदानात क्रिकेट सोडून रविंद्र जडेजाची कुत्र्यासोबत पकडापकडी, व्हीडिओ व्हायरल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कुत्र्याच्या एन्ट्रीमुळे व्यत्यय आला. काही मिनिटांसाठी सामना थांबवून कुत्रा पकडण्यासाठी धडपड सुरु झाली. इतकंच काय तर क्षेत्ररक्षण करणारा रविंद्र जडेजाही स्वत:ला आवरू शकला नाही.

Ind Vs Aus : भर मैदानात क्रिकेट सोडून रविंद्र जडेजाची कुत्र्यासोबत पकडापकडी, व्हीडिओ व्हायरल
Ind Vs Aus : भर मैदानात क्रिकेट सोडून जडेजाची कुत्र्यासोबत पकडापकडी, व्हीडिओ व्हायरल Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 5:38 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा निर्णायक सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघानी आपला जोर लावला आहे. असं असताना या सामन्यादरम्यान काही किस्सेही घडले. दोन झेल सुटले, डीआरएस रिव्ह्यू आणि कुत्र्याची एन्ट्री यामुळे उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. कुत्र्याने सामन्यात एन्ट्री मारल्यानंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला. इतकंच काय तर रविंद्र जडेजाही कुत्र्याला पकडण्यासाठी पुढे सरसावला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पहिल्या डावातील 43 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर कुत्र्याने मैदानात एन्ट्री मारली. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी गमवून 227 धावा झाल्या होत्या. सीन अब्बॉट आणि एश्टन अगर ही जोडी मैदानात खेळत होती.  कुत्रा मैदानात घुसल्यानंतर मैदानातील कर्मचारी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. सदर प्रकार सुरु असताना रविंद्र जडेजाला राहावलं नाही. त्याने मैदानात आलेल्या कुत्र्यासोबत मस्ती करण्याची संधी गमावली नाही.

मैदानातील दोन कर्मचारी कुत्र्याच्या मागे धावत असताना एक कर्मचारी पडला. त्यामुळे समालोचकांनाही आपलं हसू आवरलं नाही. कर्णधार रोहित शर्माही मैदानात हसत होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 सामन्यात अशीच एका सापाने एन्ट्री मारली होती. साप पाहून खेळाडूंची भंबेरी उडाली होती. भारतीय डावाच्या सातव्या षटकात सापाने मैदानात एन्ट्री मारली होती. तेव्हा सलामीवीर केएल राहुलने साप असल्याचं दाखवलं होतं.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 49 षटकात सर्व गडी गमवून 269 धावा केल्या आणि विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, कुलदीप यादवने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि अक्षर पटेलने 2 गडी बाद केले.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.